किया इंडिया (Kia India) या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने आज बुधवारी ऑटो एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांचा वेध घेणाऱ्या कॉन्स्पेट ईव्ही9 ( Kia Concept EV9) या कारला सादर केले. किया इंडिया भारतात ईलेक्ट्रिक कारसाठी 2000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीचे सीईओ टे जिन पार्क यांनी सांगितले. (Kia India has showcased the EV9 concept electric SUV and the new-generation Carnival at the Auto Expo 2023)
ऑटो एक्स्पोच्या 16व्या आवृत्तीत किया इंडियाने ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही श्रेणीतील किया कॉन्स्पेट ईव्ही9 ( Kia Concept EV9)मध्ये शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध करण्यात आली आहेत. कॅलिफोर्निया डिझाईन स्टुडिओमध्ये या कारची संकल्पना आणि डिझाइन केलेली. EV9 ही संकल्पना निसर्गाशी अनुरुप असून समुद्रातील कऱ्यापासून विकसित केलेल्या टिकाऊ सामग्रीतून तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कारची किंमत मात्र कंपनीने जाहीर केलेली नाही.
किया कॉन्स्पेट ईव्ही9 ( Kia Concept EV9)मध्ये 77.4 kwh क्षमतेची बॅटरी आहे. एका चार्जिंगमध्ये ही गाडी किमान 500 किमी धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मनुसार गाडीची लांबी 4930 mm असून रुंदी 2055 mm आहे. गाडीची उंची 1790 mm असून व्हीलबेस 3100 mm आहे.
किया कार्निव्हलचे अनावरण
किया इंडियाने Kia KA4 या कार्निव्हल या कारच्या चौथ्या आव़ृत्तीचे अनावरण केले. या कारमध्ये एक कमांडिंग UV स्टेन्स आहे आणि बाहेरचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे. या कारचे इंटिरियर किआच्या कॅलिफोर्निया डिझाईन स्टुडिओने डिझाइन केले आहे. Kia KA4 मालवाहू आणि प्रवासी जागा आणि आसन मांडणीमध्ये खरे नावीन्य दाखवते.