केफिन टेक्नॉलॉजीसकडून आज मंगळवारी 22 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करण्यात आले. केफिन टेक्नॉलॉजीस समभाग विक्रीतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. केफिन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. केफिन टेक्नॉलॉजीसचा आयपीओ 2.59 पटीने सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा राखीव हिस्सा 4.17 पटीने सबस्क्राईब झाला होता. मात्र ग्रे मार्केटमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसच्या शेअरचा भाव कमी झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसचा शेअर 6 रुपये डिस्काउंट दरात उपलब्ध आहे.
IPO मधून कंपनी एका प्रवर्तकाचा संपूर्ण हिस्सा विक्री करणार आहे. केफिन टेक्नॉलॉजीसमध्ये गुंतवणूक केलेल्या जनरल अटलांटिक सिंगापूर फंड या कंपनीकडून आयपीओमध्ये संपूर्ण हिस्सा विक्री केला जाणार आहे.केफिन टेक्नॉलॉजीस ही म्युच्युअल फंड उद्योगासाठी सेवा देणारी कंपनी आहे. कंपनीकडून भारतातील 41 पैकी 24 फंड कंपन्यांना सेवा देते. म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी दिला जाणाऱ्या सेवांमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसचा 59% हिस्सा आहे.
केफिन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओसाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना शेअर प्राप्त झालेत का याची खात्री वेबसाईटवरुन करता येईल. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि केफिन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओसाठी रजिस्ट्रार कंपनी (BigShare Services Pvt. Ltd.) या कंपन्यांच्या वेबसाईटवर गुंतवणूकदारांना शेअर वाटपाचा तपशील (Share Allotment Status) शोधता येईल.
बीएसई वेबसाईट असा तपासा केफिन टेक्नॉलॉजीसचा अॅलोटमेंट स्टेटस
- बीएसई वेबसाईटवर जा
- 'स्टेटस ऑफ इश्यू अॅप्लिकेशन' मध्ये इक्विटीचा पर्याय निवडा
- त्यात केफिन टेक्नॉलॉजीस हा इश्यू सिलेक्ट करा, त्यात अॅप्लिकेशन नंबर सबमिट करा
- तुमचा पॅनकार्ड नंबर सादर करा
- कॅप्चा कोड क्लिक करा
- तुमचा तपशील चेक करा
BigShare Services Pvt. Ltd. या कंपनीच्या वेबसाईटवर स्टेटस तपासा
- BigShare Services Pvt. Ltd. कंपनीच्या वेबसाईटवर जा.
- KFin Technologies ही कंपनी निवडा.
- अॅप्लिकेशन नंबर, क्लाईंट आयडी किंवा पॅनकार्ड या तीनपैकी एक पर्याय निवडा
- ASBA किवा Non ASBA यातील एक पर्याय निवडा.
- कॅप्चा कोड सबमिट करा
- अॅलॉटमेंट स्टेटस दिसेल.