केफिन टेक्नॉलॉजीचा 1500 कोटींच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. आज बुधवारी 21 डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी IPO दुपारी 2.59 पटीने सबक्राईब झाला. किरोकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्क्राईब झाला.
KFin Technologies IPO मधून आतापर्यंत 6.14 कोटी शेअर्ससाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. शेअर बाजाराकडील आकडेवारीनुसार आयपीओ 2.59 पटीने सबस्काईब झाला. आयपीओमधून कंपनी 2.37 कोटी शेअर्स इश्यू करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्काईब झाला आहे.
क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल सबस्क्राईबरचा हिस्सा 4.17 पटीने सबस्क्राईब झाला आहे. हाय नेटवर्थ असलेल्या गुंतवणूकदारांनी मात्र या इश्यूकडे सपशेल पाठ फिरवली. त्यांचा राखीव हिस्सा केवळ 23% सबस्क्राईब झाला.
कंपनी आयपीओतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. त्यापैकी 675 कोटी अॅंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी उभारण्यात आले आहे. आयपीओसाठी प्रति शेअर 347 - 366 रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.