Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Emergencies: या इमर्जन्सी खर्चापासून तुमचे सेव्हिंग अकाउंट सेफ ठेवा!

Money Emergencies

Money Emergencies: इमर्जन्सी फंड हा अनपेक्षित घटनांसाठीच राखीव ठेवलेला असतो. पण त्याचा वापर करताना त्याच्या सिमा ठरवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण काही बेसिक उपाययोजनांमुळे तुमचा इमर्जन्स फंड सेफ राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात असे काही इमर्जन्सी खर्च आणि त्यावरील उपाय. ज्यामुळे तुमच्या बचत खात्यावर ताण येणार नाही.

Money Emergencies: अनपेक्षित येणारे खर्च खूप धोकादायक असतात. इतके धोकादायक की, वर्षानुवर्षे घासून-घासून जमा केलेली पैसे एका फटक्यात संपतात आणि शेवटी पुन्हा खिसा मोकळा. त्यामुळे अपेक्षित इमर्जन्सी फंड किती असावा याला काही लिमिटच नाही.

इमर्जन्सी फंडमधील पैसा पुरवा यासाठी दोनच गोष्टी शक्य आहेत. सगळ्यात पहिली तर इमर्जन्सी फंडचा वापर करावा लागण्याची वेळच येऊ नये आणि दुसरी म्हणजे इमर्जन्सी फंडामध्ये प्रत्येक महिन्याला वाढ होत राहिली पाहिजे. या दोन गोष्टी व्यवस्थित होत असतील तर तुमचे सेव्हिंग अकाउंट आणि इमर्जन्सी फंड कधीच रिकामा होणार नाही. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, ज्यामुळे सगळी बचत खर्च होते. तर अशा घटनांपासून नेहमी सावध असले पाहिजे. चला तर जाणून घेऊयात खिशाला फोडणी देणाऱ्या आपत्कालीन घटना...

मेडिकल इमर्जन्सी (Medical Emergency)

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायला कोणालाच आवडत नाही. पण कधीकधी असे प्रसंग येतात वाट्याला. अशावेळी पैशांपेक्षा आपल्याला आपला माणूस प्रिय असतो. त्यामुळे आपण त्याच्यावर हवा तितका पैसा खर्च करतो. ही परिस्थिती फक्त भारतातच आहे, असे नाही तर अमेरिकेतही हीच स्थिती आहे. तिथले माणसे मेडिकल उपचारांसाठी भरपूर कर्ज घेतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली स्वत:ला दाबून घेतात.

मेडिकल इमर्जन्सीपासून स्वत:ची सुटका करून घ्यायची असेल तर पुरेसा मेडिकल इन्शुरन्स काढणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. बरेच जण मला काही होणार नाही, या आविर्भावात राहून मेडिकल इन्शुरन्स काढत नाहीत आणि शेवटी जमा केलेला सर्व पैसा खर्च करावा लागतो. तर मेडिकल इमर्जन्सीच्या खर्चापासून स्वत:चे सेव्हिंग दूर ठेवा.

घराची दुरुस्ती (Home Repair)

घराची दुरुस्ती हे एक निमित्त असते. या दुरुस्तीच्या नादात अनेक जण भरमसाठ पैसे खर्च करून घराचा चेहरामोहराच बदलून टाकतात. आपल्याकडे तसेही म्हटले जाते की, घर पहावे बांधून. नवीन घर बांधणे किंवा खरेदी करणे हे वाटते तितके सोपे नाही. त्याचबरोबर घराची दुरुस्ती हा सुद्धा एक मोठा खर्च असतो. घराची दुरुस्ती करताना पैशाचे लिमिट लॉक केले नाही तर पाण्यासारखा पैसा खर्च होतो. यामध्ये तुमची आयुष्यभराची अर्ध्याहून अधिक कमाई जाऊ शकते. त्यामुळे घर दुरुस्ती, मेन्टेनन्सवर खर्च कमीतकमीच करावा.

नोकरीवर गदा (Job Loss)

कोरोनाच्या काळात नोकरीवर पाणी सोडण्याचे दु:ख अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. काहींना शहरातील घरं विकून गाव गाठावे लागले. तर काहींना स्वत:चे राहते घर विकून भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. नोकरदार कुटुंबासाठी नोकरी हा एकमेव उत्पन्नाचा आधार असतो. नोकरी गेली की, संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट कोसळतं. नवीन नोकरी मिळेपर्यंत जमा केलेला सर्व निधी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी वापरावा लागतो. तशी ही परिस्थिती कोणी स्वत: ओढवून घेत नाही. पण आल्यावर तिला सामोरे जाण्याची तयारी मात्र केलीच पाहिजे.

कार रिपेअरिंग (Car Reparing)

कार रिपेअरिंगचा खर्च हा एक खूप मोठा अनपेक्षित खर्च असतो. गाडी दुरुस्तीवर किती खर्च होईल. हे कधीच सांगत येत नाही. त्यात इन्शुरन्स नसेल तर पुरती वाट लागते. सर्व जमा केलेली जमापुंजी गाडीच्या दुरुस्तीसाठी खर्च करावी लागते. ती करावी लागू नये. यासाठी गाडीचा इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या सेव्हिंग खात्यावर किंवा इमर्जन्सी फंडावर ताण येणार नाही.

तर अशाप्रकारच्या खर्चापासून तुमचे सेव्हिंग अकाउंट दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाची तरतूद करा किंवा हे असे खर्च वाट्याला येणार नाहीत, अशी काळजी घ्या. पण तुम्ही म्हणाल की, इमर्जन्सी फंड हे अशाच अनपेक्षित खर्चांसाठी असतात. त्यामुळे ते त्यावर खर्च करायला काय हरकत आहे. इमर्जन्सी फंड खर्च करायला काहीच हरकत नाही. पण जे खर्च काही उपाययोजनांमुळे टळू शकतात. त्याचे ओझे तुम्ही विनाकारण वाहण्याची काहीच आवश्यकता नाही. जसे की हेल्थ इन्शुरन्स, कार इन्शुरन्समुळे तुमच्या सेव्हिंगवर कोणताच परिणाम व्हायला नाही पाहिजे.