स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांची ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी दिली आहे. तुम्ही देखील एसबीआयचे बँक खातेदार असाल आणि कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच.
स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी आधार कार्डद्वारे सरकारच्या विविध योजनांमध्ये नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच तुमचे जर या बँकेत खाते असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे गोळा करावी लागणार नाहीये. केवळ तुमचे आधारकार्ड यापुढे पुरेसे ठरणार आहे.
केंद्र सरकारद्वारे तळागाळातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी योजना राबविल्या जातात. मात्र कागदपत्रांच्या अभावी, माहितीच्या अभावी अनेकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘जन धन योजने’मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचे बँक खाते सुरु केले गेले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिग क्षेत्रात आणण्याची ही खास योजना आहे. त्यामुळे बँकेत खाते असलेल्या नागरिकांना केवळ आधार कार्डच्या आधारे सुविधा प्रदान करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
Good news for #SBI customers
— News&Deals (@sangeeta0401) August 26, 2023
SBI has launched new services to make it easier to apply for central schemes. If you go to the Customer Service Points (CSP) in their branches and provide your Aadhaar number, pic.twitter.com/VJ2KXCiLVL
या नवीन सुविधेचा शुभारंभ करताना, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सुविधा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांवर (CSPs) सर्व खातेदारांसाठी उपलब्ध असेल असेही ते म्हणाले.
खारा म्हणाले की, बँकेने सुरु केलेल्या या नवीन सुविधेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळविण्यातील अडथळे दूर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवणे हा आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) आणि अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना केवळ आपले आधार कार्ड बँकेत घेऊन जाण्याची गरज भासणार आहे. याशिवाय अन्य कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाहीये.