Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple AirTags शी स्पर्धा करणार JioTag, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

JioTag

खरे तर ‘JioTag’ हे नाव देखील Apple Air Tag शी साधर्म्य असणारे आहे. ॲपल एअर टॅगच्या तुलनेत JioTag ची किंमत देखील कमी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस ट्रेस ‘JioThings’ या ॲपशी कनेक्ट करावे लागेल. त्यांनतर युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.

ॲपल एअर टॅगशी स्पर्धा करण्यासाठी आता जिओ मैदानात उतरली आहे. होय जिओने आता स्वतःचे ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस JioTag भारतात लॉन्च केले आहे. भारतातील तरुणांची लोकसंख्या आणि त्यांचा तंत्रज्ञानातील वाढता वापर लक्षात घेता येणाऱ्या काळात जिओ ॲपलचे मार्केट खाणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेकांना आपल्या वस्तू विसरण्याची सवय असते. तुम्ही कुठे तरी बाहेर फिरायला जाता आणि मोबाईल फोनसह चावी, पाकीट वैगेरे वस्तू विसरून येता. नेमकं तुम्हांला आठवत नाही की तुम्ही तुमचा मोबाईल फोन आणि इतर वस्तू कुठे ठेवल्या आहेत. अशावेळी जर तुमचा मोबाईल फोन कुठल्या डिव्हाइसला कनेक्ट असेल तर तुम्हांला तुमच्या मोबाईलचे लोकेशन जाणून घेता येईल आणि मोबाईल सोबत असलेले सामान देखील शोधता येणार आहे.

खरे तर ‘जिओ टॅग’ हे नाव देखील ॲपल एअर टॅगशी साधर्म्य असणारे आहे. ब्लूटूथद्वारे ट्रॅकिंग करण्यासाठी आणि फिजिकल कनेक्टिविटी टाळून ब्लूटूथ कनेक्टिविटीद्वारे मोबाईलचा वापर करण्यासाठी हे वापरले जाते. ॲपल एअर टॅगच्या तुलनेत JioTag ची किंमत देखील कमी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस वापरण्यासाठी ‘JioThings’ या ॲपशी कनेक्ट करावे लागेल. त्यांनतर युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.

JioTag ची वैशिष्ट्ये

जिओ बॉक्समध्ये अतिरिक्त बॅटरी आणि डोरी केबल दिली जात आहे. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसशी JioTag कनेक्ट करणे सोपे होणार आहे. जिओटॅगचा वापर तुमचा मोबाईल फोन कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी देखील केला जातो. अगदी तुमचा मोबाईल फोन हरवला असेल तर अशावेळी देखील जिओ टॅगच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल ट्रेस करू शकता. मुख्यत्वे मोबाईल हरवलेला असताना तो शोधण्यासाठी जिओ टॅग वापरले जाते.

जिओ टॅगचे फीचर्स देखील एअर टॅगच्या बरोबरीचे आहेत. यात CR2032 बॅटरी आहे, जी युजर्सला बदलता येऊ शकते. ही बॅटरी एक वर्षापर्यंत बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे.  जिओ टॅगच्या रेंजचा जर विचार केला तर इनडोअरसाठी 20 मीटर आणि आऊट डोअरसाठीसाठी 50 मीटरपर्यंत जिओ टॅग रेंज देतो.

जिओ टॅगमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.1 देण्यात आला आहे. जिओ टॅगला कनेक्ट असलेली एखादी गोष्ट जर तुम्ही कुठे विसरलात आणि त्या वस्तूपासून कुठे दूर जाऊ लागलात तर JioTag तुम्हाला अलर्ट करेल. तसेच तुम्ही कुठे तुमचा मोबाईल विसरला आहात ते स्थान देखील जिओ टॅग सांगेल.

JioThings हे ॲप Google Play Store आणि Apple App Store दोन्हीवर युजर्स  डाउनलोड करू शकतात. तुम्ही JioTag वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून तुमचा मोबाईल सहज पेअर करू शकता. या उपकरणाचा आकार 3.82×3.82×0.72 सेमी आणि वजन 9.5 ग्रॅम आहे.

किंमत किती?

कंपनीने आपले ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस JioTag 749 रुपयांमध्ये लॉन्च केले आहे. हे जिओच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. त्याची  किंमत 2,199 रुपये इतकी आहे. सध्या केवळ पांढऱ्या रंगात जिओ टॅग उपलब्ध आहे. ॲपल एअर टॅगची किंमत 2,999 रुपये इतकी आहे. म्हणजेच जिओ टॅगची किंमत ॲपल एअर टॅगच्या तुलनेत 800 रुपयांनी कमी आहे.