Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Prepaid Plan Offers: जिओची धमाल ऑफर! 'या' दोन प्रिपेड रिचार्जवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मोफत

Jio Recharge with Netflix

Image Source : www.hindubabynames.info

जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओ मोबाइल प्रिपेड प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शनची मिळू शकतं. कोणत्या प्लॅन्सवर नेटफ्लिक्स मोफत पाहता येईल ते पाहा.

Jio Prepaid Plan Offers: रिलायन्स जिओ कंपनीने प्रिपेड मोबाइल ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. आता प्रिपेड रिचार्जवर नेटफ्लिक्सचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. जास्त किंमतीच्या रिचार्जवर ही ऑफर कंपनीने लागू केली आहे.

जिओकडून ही ऑफर आधी फक्त पोस्टपेड आणि फायबर प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांसाठी होती. मात्र, आता ही ऑफर प्रिपेड ग्राहकांसाठीही लागू केली आहे. पहिल्यांदाच अशी ऑफर जिओकडून ग्राहकांना मिळणार आहे. आज शुक्रवारी जिओने ऑफरची घोषणा केली. जिओचे सुमारे 40 कोटी ग्राहक आहेत. त्यांना या ऑफरचा फायदा घेता येईल. 

कोणत्या प्लॅन्सवर नेटफ्लिक्स मिळणार?

84 दिवसांसाठीच्या 1099 रुपयांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनमध्ये 2 GB प्रतिदिन इंटरनेट आहे. 

84 दिवसांसाठीच्या 1499 रुपयांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनमध्ये 3 GB प्रतिदिन इंटरनेट आहे. 

अधिक माहितीसाठी जिओ संकेतस्थळाला भेट द्या. 

नेटफ्लिक्सचा आनंद घ्या जिओच्या रिचार्जवर

ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा एक भाग म्हणून नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्रिपेड ग्राहकांसाठीही सुरू केले आहे. नेटफ्लिक्सच्या सहकार्याने जिओद्वारे मिळणाऱ्या सुविधा अधिक चांगल्या होतील, असे जिओ चे सीइओ किरण थॉम्सन यांनी म्हटले. 

जिओ सोबत काम करताना आम्ही उत्सुक आहोत. मागील अनेक वर्षांपासून आम्ही नेटफ्लिक्ससाठी खूप चांगले शो, डॉक्युमेंटरी आणि स्थानिक कंटेटची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. जिओ प्रिपेडसोबत नेटफ्लिक्स उपलब्ध झाल्याने आणखी ग्राहकांना फायदा मिळेल, असे एशिया पॅसिफिक विभागाचे नेटफ्लिक्स प्रमुख Tony Zameczkowski यांनी म्हटले.