आपल्या सगळ्यांनाच फेक कॉल आणि नको असलेले मेसेज सतत येत असतात. हल्ली याचे प्रमाण वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) फोन कॉलच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांतर्गत TRAI एक फिल्टर सेटअप घेऊन येत आहे. ज्यामुळे फेक कॉल आणि मेसेजपासून सुटका करण्यासाठी मदत होणार आहे. हा नवीन नियम 1 मे 2023 पासून लागू होणार आहे. या नियमानंतर फेक कॉल आणि मेसेजपासून वापरकर्त्यांची सुटका होण्यासाठी मदत होणार आहे.
1 मे पासून नवीन नियम लागू
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कंपन्यांना फोन कॉल आणि मेसेज सेवेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर (Artificial Intelligence Spam Filters) लावणे आवश्यक आहे. हा फिल्टर वापरकर्त्याला फेक कॉल आणि मेसेजपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करणार आहे.
हा नवीन नियम 1 मे पासून लागू होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना 1 मे 2023 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर लावावा लागणार आहे. एअरटेल (Airtel) कंपनीने त्यांच्या ग्राहकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टरची सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. तर जिओ (Jio) कंपनीसुद्धा लवकरच या फिल्टरची सुविधा देण्याची तयारी करत आहे.
लवकरच येणार कॉलर आयडी फीचर
TRAI बऱ्याच दिवसापासून फेक कॉल आणि मेसेजवर रोख लावण्यासाठी नियम बनवण्याचा प्लॅन करत आहे. या नियमांतर्गत TRAI 10 अंकाच्या मोबाईल नंबरवरून आलेल्या प्रमोशनल कॉलवर रोख लावण्याची मागणी करत आहे. तसेच TRAI ने कॉलर आयडी फीचर सुद्धा आणले आहे. जे वापरकर्त्याला कॉल केल्यानंतर फोटो आणि त्याचे नाव डिस्प्लेवर दाखवण्यासाठी मदत करेल. एअरटेल (Airtel) आणि जीओ (Jio) कंपनी यांच्यासोबत ट्रायच्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरु आहे. पण या कंपन्या कॉलर आयडी फीचर लागू करण्यासाठी अजून तयार नाहीत.
Source: hindi.moneycontrol.com