सध्या इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची प्रोसेस सुरु आहे. नोकरदार वर्ग रिटर्न फायलिंगसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात बिझी आहे. रिटर्न फायलिंग करताना अनेकांना रिफंडची अपेक्षा असते. योग्य माहिती सादर केली तर रिफंड मिळतो. मात्र जास्तीत जास्त रिफंड मिळवण्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स फॉलो करणं आवश्यक आहे.
जर तुम्ही अदा केलेली कराची रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नाच्या तुलनेत जास्त असेल तर तुम्हाला रिफंड मिळू शकतो. इन्कम टॅक्स रिफंडसाठी 31 जुलै 2023 ही अंतिम तारिख आहे. त्यानंतर रिटर्न फायलिंग करणाऱ्यांना दंडात्मक रक्कम भरावी लागेल.
आयटीआर फायलिंग करताना तुम्हाला उत्पन्न, गुंतवणूक आणि कर्ज किंवा देणी यांचा तपशी सादर करावा लागतो. रिटर्न फायलिंग करताना तुम्हाला जास्तीत जास्त रिफंड मिळवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा योग्यपणे वापर करणे आवश्यक आहे.
रिफंड किंवा कर बचतीसाठी केवळ फॉर्म 16 पुरेसा ठरणार नाही. यासाठी योग्य कर प्रणालीची निवड करणे, अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न फायलिंग केला तर रिफंड प्रोसेस झटपट होते. जास्तीत जास्त रिफंडसाठी काही महत्वाच्या स्टेप्स फॉलो करायला हव्यात.
Table of contents [Show]
अचूक कर प्रणालीची निवड करा (Tax Regime)
टॅक्सपेअर्ससमोर दोन कर प्रणालींचा पर्याय उपलब्ध आहे. यातील अचूक कर प्रणाली निवडणे अत्यंत महत्वाचे आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये नवीन कर प्रणालीची घोषणा केली होती. त्याशिवाय करदात्यांना त्यांच्या गरजेनुसार कर प्रणालीची निवड करता येईल, असे म्हटले होते. त्यामुळे रिटर्न फायलिंग करण्यापूर्वी कोणत्या कर प्रणालीत तो प्रोसेस करणार हे ठरवणे महत्वाचे आहे.
रिटर्न फायलिंग वेळेत करा (File ITR Before Deadline)
अंतिम मुदत किंवा शेवटच्या दिवसाची वाट पाहण्याऐवजी करदात्यांनी शक्यतो वेळेत रिटर्न फाईल करण्याचा सल्ला दिला जातो. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न फाईल केल्यास पेनल्टी टाळता येते. तुम्हाला जास्तीत जास्त रिफंड मिळण्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
ITR चे नियोजित वेळेत व्हेरिफिकेशन होणे आवश्यक
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यावर त्याची 30 दिवसांच्या आत छाननी होणे आवश्यक आहे. या मुदतीत व्हेरिफिकेशन झाले नाही तर तो अवैध मानला जाईल. तुम्हाला पुन्हा नव्याने ITR ची प्रोसेस करावी लागेल. जर अंतिम मुदत असेल तर पुन्हा रिटर्न फाईल करता येऊ शकतो. मात्र अंतिम मुदत संपली असल्यास त्या वर्षासाठी ITR फाईल करता येणार नाही. त्यामुळे वेळेत व्हेरिफिकेशन करणे खूप महत्वाचे आहे.
कर वजावटींचा क्लेम करा (Claim Tax Deduction)
रिटर्न फाईल करताना सरकारकडून करदात्यांना विमा, गृहकर्ज, पीपीएफ आणि सरकारी अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवर कर वजावट देते. तुम्हाला जास्तीत जास्त कर परतावा हवा असल्यास या गोष्टींचा फायदा होतो. विशेषत: नोकरदार वर्गाला ज्यांच्याजवळ फॉर्म 16 आहे अशा नोकरदारांना स्टॅंडर्ड डिडक्शनचा फायदा मिळतो. त्यामुळे रिटर्न फाईलपूर्वी उत्पन्न आणि कर वजावटींचा आढावा घेणे आवश्यक आहे.
बँक खात्याचा तपशील तपासून घ्या (Check Bank Details)
इन्कम टॅक्स ई-पोर्टलवर तुम्ही दिलेली बँक खात्याची माहिती रिटर्न फायलिंग करण्यापूर्वी तपासून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला जर रिफंड मिळणार असेल तर तो थेट बँक खात्यात जमा होतो. त्यामुळे रिफंडसाठी बँक खाते अॅक्टिव्ह आणि अचूक असणे आवश्यक आहे.