इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत होती. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 31 जुलैअखेर 6 कोटी 70 लाख रिटर्न फाईल करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक 18 लाख 52 हजार 754 टॅक्सपेअर्सनी रिटर्न फाईल केला आहे. आयटीआर फायलिंगमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. सर्वात कमी रिटर्न फाईल लडाखमधून झाले आहेत. केवळ 72 करदात्यांनी रिटर्न फाईल केले.
केंद्र सरकारने राज्यनिहाय रिटर्न फाईल करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमधून 14 लाख 2 हजार 636 रिटर्न फाईल करण्यात आले. तिसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश असून या राज्यातून अंतिम मुदतीपर्यंत 11 लाख 92 हजार 12 आयटीआर झाले आहेत.
चौथ्या स्थानावर पश्चिम बंगाल असून 9 लाख 8 हजार 136 विवरणपत्रे सादर करण्यात आली. पाचव्या स्थानावर राजस्थान असून येथून 8 लाख 36 हजार 958 रिटर्न फाईल करण्यात आले.
सहाव्या स्थानी तामिळनाडू 8 लाख 19 हजार 691 आयटीआर, सातव्या स्थानावर आंध्र प्रदेश असून येथून 8 लाख 12 हजार 128 रिटर्न फाईल झाले आहेत.

आठव्या स्थानावर कर्नाटक राज्य असून यामधून 7 लाख 41 हजार 902 आयटीआर फाईल झाले आहेत. नवव्या स्थानावर मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशातून 4 लाख 99 हजार 676 विवरणपत्रे सादर करण्यात आली. दहाव्या स्थानी राजधानी दिल्ली आहे. दिल्लीतून 4 लाख 77 हजार 354 रिटर्न फाईल करण्यात आली आहेत.
सर्वात कमी संख्येने इन्कम टॅक्ल रिटर्न फाईल झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लडाख केवळ 72 आयटीआर, लक्षद्विप 550 आयटीआर, दादरा नगर हवेली 5438, दमण आणि दिव 3863 आयटीआर यांचा समावेश आहे.
ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यातून 4438 आयटीआर, आसाममधून 1 लाख 81 हजार 499 आयटीआर, अरुणाचल प्रदेशातून 8774 आयटीआर फाईल करण्यात आले. नागालॅंडमधून 9883, मेघालयमधून 14374, मिझोरममधून 3300, त्रिपुरामधून 26206, मेघालयमधून 15905 रिटर्न फाईल करण्यात आले आहेत.
पहिल्यांदाच रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या वाढली
यंदाच्या वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करणाऱ्यांची संख्या 16.1% वाढली आहे. पहिल्यांदाच रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या 53 लाख 67 हजार इतकी आहे. यावरुन करकक्षेत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे . 31 जुलै 2023 रोजी एकाच दिवसात तब्बल 64 लाख 33 हजार रिटर्न फाईल झाले होते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            