ITR Filing: जर तुम्हाला YouTube मधून चांगले पैसे मिळत आहेत; आणि हा तुमच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असेल तर यातून मिळणारे पैसे हे व्यवसायातून मिळणारे पैसे समजले जातात. त्यावर प्रोफेशनल इन्कम अंतर्गत टॅक्स लागतो.
सध्या यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातून अनेकांना चांगले पैसेदेखील मिळत आहेत. अनेक तरुणांनी आपली नियमित नोकरी सोडून YouTuber बनणे निवडले आहे. पण या तरुणांना युट्यूबमधून मिळणाऱ्या पैशांवर लागणाऱ्या टॅक्सच्या नियमांबद्दल माहिती नाही. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये भारतातील बऱ्याच YouTubersना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली होती. त्यामुळे तुम्हीदेखील युट्यूबमधून पैसे कमवत असाल तर टॅक्सशी संबंधित नियमांची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.
इन्कम टॅक्स कायद्यामध्ये एका आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळाले किंवा किती उत्पन्नापर्यंत टॅक्स लागणार नाही. याबद्दल सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या नोकरीतून जेवढे उत्पन्न मिळते. तेवढेच उत्रन्न व्यवसाय किंवा यूट्यूब किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्ममधून मिळत असेल तर त्यासाठी सर्वांना नियम समान आहे. यूट्यूबमधून मिळणारे उत्पन्न व्यवसायातून मिळणारे उत्पन्न मानले जाते आणि त्यावर प्रोफेशनल इन्कम अंतर्गत टॅक्स लागतो. तसेच तु्म्ही नोकरी सांभाळून आवड म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल तर ते तुमचे इतर स्त्रोतातून आलेले उत्पन्न मानले जाते.
YouTuberवर टॅक्स कसा आकारला जातो?
जे नव्याने YouTube वर व्हिडिओ बनवत आहेत. त्यांना असे वाटते की, यूट्यूबमधून मिळणाऱ्या पैशांचा सरकारशी काही संबंध नाही. पण असे नाही. यूट्यूब हा तुमचा छंद असो किंवा तुमचे प्रोफेशन त्यातून मिळणारे पैसे हे तुमचे अधिकृत इन्कम मानले जाते. त्यामुळे त्यावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जाऊ शकतो. तुम्हाला तशी इन्कम टॅक्स ऑफिसकडून नोटीस येऊ शकते. जर तुमचे वार्षिक उत्रन्न 2.5 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. पण तुमचे उत्पन्न 2.5 ते 5 लाख रुपये यादरम्यान असेल तर त्यावर 5 टक्के आणि 5 ते 10 लाखाच्या उत्पन्नावर 20 टक्के तर 10 लाखापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आकारला जातो.