Reliance Retail Enters Into Joint Venture : भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची प्रमुख ईशा अंबानी आता खेळणी बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे. रिलायन्स रिटेलने रविवारी यासंबंधीत एक घोषणा केली. ईशा अंबानीने हरियाणास्थित कंपनीसोबत संयुक्तपणे करार करुन, खेळण्यांच्या स्थानिक उत्पादनाच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील घरगुती खेळण्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स रिटेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे .
संयुक्तपणे कार्य करणार कंपनी
रिलायन्स रिटेलने सध्या यूकेचा लहान मुलांच्या खेळण्यांचा ब्रँड हॅम्लेज आणि ब्रँड रोवन आणि सोनपतची कंपनी ई सर्कल रिटेलसोबत संयुक्तपणे खेळण्यांचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवसायात रिलायन्स रिटेल कंपनी डिझाइनपासून ते सेल्फ डिलिव्हरीपर्यंत सर्व प्रक्रिया एकत्रित करण्याच्या धोरणावर काम करत आहे. या करारानंतर,रिलायन्स रिटेलचे टॉय इकोसिस्टमच्या संपूर्ण गोष्टींवर नियंत्रण असेल. कारण, रिलायन्स रिटेल डिझाईन करण्यापासून ते खेळण्यांचे उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत सर्व कार्यावर स्वत: नियंत्रण ठेवुन, ते स्वत:च करणार आहे. यामुळे रिलायन्सचे थर्ड पार्टी अवलंबित्व कमी होईल.
खेळण्यांच्या बाजारपेठेतही रिलायन्स पाहूल
यामध्ये रिलायन्स रिटेल टॉईजच्या विद्यमान दोन ब्रँड्स,हॅमलेज आणि रोवनची जबाबदारीही संयुक्तपणे घेण्यात येणार आहे. रिलायन्स रिटेल ही B2B विभागातील एक मोठी कंपनी आहे, ती रोवन ब्रँडद्वारे व्यवसाय करते. सर्कल ई रिटेल या कंपनीचे खेळण्यांच्या निर्मितीमध्ये स्पेशलायझेशन आहे. हरियाणामध्ये त्याची आधुनिक उत्पादन सुविधा आहे आणि खेळण्यांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन आणि वितरण करण्यास ही कंपनी सक्षम आहे. गेल्या वर्षी, रिलायन्स रिटेलने त्यांचा खेळण्यांचा ब्रँड रोवन बी2बी घाऊक वरून सामान्य किरकोळ बाजारात सादर केला. रिलायन्स रिटेलच्या या वाटचालीचा उद्देश ब्रँडेड खेळण्यांच्या बाजारपेठेत मोठा वाटा मिळवणे आणि लहान दुकानांपर्यंतही पोहोचणे हा आहे.