Share Market Education: शेअर मार्केटबद्दल माहिती घेण्यासाठी कोर्स सुद्धा भरपूर आहेत पण म्हणतात ना, थेअरी (theory) कितीही वाचली तरी पुरेपूर ज्ञान मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल (Practical) महत्वाचे आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यात तज्ञ असलेल्या व्यक्ती बरोबर राहून त्यात इन्वेस्ट करून त्याबाबत हवी ती माहिती घेऊ शकता. तुमचे जर शिक्षण कॉमर्समध्ये (Commerce)झाले असेल तर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल जाणून घेण्यास अत्यंत सोपे जाईल. शेअर मार्केटबद्दल जाणून घेण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
शेअर मार्केटबद्दल जाणून घेण्यासाठी कॉमर्स डिपार्टमेंट.. (Commerce Department to learn about share market..)
जर तुम्हाला कॉमर्स डिपार्टमेंट 12वीमध्ये 55 टक्के गुण मिळाले असतील तर तुम्ही त्यात बॅचलर पदवी मिळवू शकता. स्टॉक ब्रोकर कॉमर्स, अकाउंटन्सी, अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा व्यवसाय प्रशासन (Stockbroker Commerce, Accounting, Economics, Statistics or Business Administration) इत्यादींचा अभ्यास करू शकतात. जर तुम्हाला स्टॉक ब्रोकर बनायचे असेल तर यासाठी भारतातील अनेक संस्थांमध्ये सर्व प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्याला शेअर बाजार क्षेत्राचे सखोल ज्ञान मिळते. यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन (Graduation and Post Graduation) करू शकता.
शिक्षण न घेतलेला व्यक्तीसुद्धा याबाबत तज्ञ होऊ शकतो का? (Can even an uneducated person become an expert in this?)
प्रत्येकाला शिक्षण जमेलच असे नाही, काही लोकांना फक्त व्यवसाय करण्यात इंटरेस असतो म्हणून ते हिशेब करता येईल इतके शिक्षण घेऊन आपल्या कामाला सुरवात करतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केट सुद्धा आहे, एखाद्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये जर इंटरेस असेल तर तो, त्याबाबतीत तज्ञ होऊ शकतो. तो असा की, थोड्या इन्वेस्ट मधून सुरवात करून त्यातील बेसिक ज्ञान घेऊ शकतो. त्यानंतर प्रॅक्टिकल गोष्टी करून तो त्यातील तज्ञ सुद्धा बनू शकतो. उदा. मला शेअर मार्केटमध्ये इंटरेस आहे, मी एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या सानिध्यात राहून तेच तेच ऐकत गेली तर त्याबाबतीत माझे ज्ञान आपोआप वाढेल आणि त्यात अधिक इंटरेस निर्माण होईल.
कोणत्या प्रोफाइलवर नोकरी करू शकता? (Which profile can be employed?)
या करिअरमध्ये, एखाद्याला इक्विटी डीलर, इक्विटी ट्रेडर, इक्विटी सल्लागार, स्टॉक सल्लागार, वेल्थ मॅनेजर, आर्थिक विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार, सुरक्षा विश्लेषक आणि जोखीम व्यवस्थापक (Equity Dealer, Equity Trader, Equity Advisor, Stock Advisor, Wealth Manager, Financial Analyst, Investment Advisor, Security Analyst and Risk Manager) म्हणून नोकरीच्या मोठ्या संधी मिळू शकतात. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे तर उमेदवार वाणिज्य शाखेतील असतील तर त्यांच्यासाठी हे क्षेत्र अधिक चांगले होईल. कॉमर्समध्ये 12वीमध्ये 55 टक्के मार्क्स असतील तर त्यामध्ये यूजी, पीजी अशी डिग्री मिळवता येते. याशिवाय त्याच्या क्षेत्रातील व्यावसायिकालाही या विषयाशी संबंधित सखोल ज्ञान असावे.