Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan: गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यनंतर गृहकर्ज माफ होते का? जाणून घ्या काय आहे नियम?

Home Loan

‘लग्न करावे बघून आणि घर पाहावे बांधून’ असं उगाच म्हटलं जात नाही. 20-30 वर्षांच्या दीर्घकाळासाठी गृह कर्ज घेणे ही आता साधारण बाब आहे. परंतु दुर्दैवाने गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या घराचे, तसेच गृहकर्जाचे काय होते? याबाबत तुम्हांला काही कल्पना आहे का? जर याबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर हा आलेख जरूर वाचा.

गृहकर्ज घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कागदपत्रे जमा करा, पैशाची तजवीज करा, बिल्डरकडून ना हरकत प्रमाणपत्र आणा, इत्यादी इत्यादी. ‘लग्न करावे बघून आणि घर पाहावे बांधून’ असं उगाच म्हटलं जात नाही. 20-30 वर्षांच्या दीर्घकाळासाठी गृह कर्ज घेणे ही आता साधारण बाब आहे. परंतु दुर्दैवाने गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या घराचे, तसेच गृहकर्जाचे काय होते? याबाबत तुम्हांला काही कल्पना आहे का? जर याबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर हा आलेख जरूर वाचा.

एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कुठली बँक तुम्हांला गृहकर्ज देते तेव्हा त्यावर विमा उतरवण्यास सांगितले जाते. तुम्ही जर विमा घेण्यास टाळाटाळ करत असाल तर तुम्ही संभाव्य नुकसानीला आमंत्रण देत आहात हे लक्षात ठेवा. घराचे आगीपासून, भुकंपापासून, चोरीपासून संरक्षण करण्यासाठी जसा विमा उतरवला जातो तासाच विमा गृहकर्जाचा देखील उतरवला जातो.

आता मूळ मुद्द्याकडे येऊया. जर गृह कर्ज घेतलेल्या व्यक्तीचे दुर्दैवाने जर आकस्मिक निधन झाले तर बँक कर्ज माफ करते का? असा प्रसंग जर ओढवला तर बँक आधी सदर घराचा विमा उतरवला आहे किंवा नाही हे बघते. गृहकर्जावर विमा उतरवलेले कर्ज आणि विमा न उतरवलेले कर्ज याबाबत बँका वेगवेगळा निर्णय घेते. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

विमा नसलेले गृहकर्ज

कर्जदाराच्या मृत्युनंतर जेव्हा बँकेचे हफ्ते भरले जात नाहीत तेव्हा बँकेचे प्रतिनिधी मृत कर्जदाराच्या कुटुंबियांची भेट घेतात. कर्जदारांच्या कायदेशीर वारसांना या कर्जाबद्दल माहिती देतात आणि राहिलेले कर्ज फेडण्याची विनंती करतात. जर वारसांनी कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली तर गृहकर्ज सदर व्यक्तीच्या नवे वर्ग केले जाते. तसेच आर्थिक अडचणींमुळे कुटुंबियांची कर्ज फेडण्याची ऐपत नसेल तर बँक त्या घराचा ताबा घेते.

विमा उतरवलेले गृहकर्ज 

गृहकर्ज घेताना कर्जदाराने गृहकर्जाचा विमा उतरवला असेल, तर कर्जदार व्यक्तीच्या मृत्यूनंतर विम्याच्या पैशातून बँका कर्जाची रक्कम वजा करते आणि कर्जाची सेटलमेंट करते. याचा अतिरिक्त आर्थिक भार व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबावर पडत नाही. त्यामुळे गृहकर्जावर विमा घेणे शहाणपणाचे मानले जाते. गृहकर्जाची सेटलमेंट झाल्यानंतर घराची कागदपत्रे आणि मालकी कर्जदारांच्या कायदेशीर वारसांना सोपवली जाते.

यावरून तुम्हांला कल्पना आली असेल की कुठल्याही परिस्थिती बँका गृहकर्ज माफ करत नाही. गरजूंना कर्ज देणे आणि त्यावर व्याज कमावणे हा बँकांचा व्यवसाय आहे, त्यामुळे ते कुणाचेही कर्ज माफ करत नाही हे लक्षात घ्या. तसेच जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर त्यावर विमा नक्की उतरवा, त्यामुळे तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.