Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax on Weekly Market: आठवडी बाजारात माल विकण्यासाठी प्रशासनाला टॅक्स द्यावा लागतो का?

Weekly Market

Tax on Weekly Market: आठवड्याच्या ठराविक दिवशी निश्चित केलेल्या ठिकाणी भरणाऱ्या बाजाराला आठवडी बाजार म्हणतात. दर आठवड्याला एक दिवस, जागा ठरवून विविध प्रकारची दुकाने लावली जातात. इतकीच माहिती आठवडी बाजाराबाबत लोकांना आहे. पण या विक्रेत्यांना स्थानिक पातळीवर टॅक्स भरावा लागतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Tax on Weekly Market: आठवड्याच्या ठराविक दिवशी निश्चित केलेल्या ठिकाणी भरणाऱ्या बाजाराला आठवडी बाजार म्हणतात. दर आठवड्याला एक दिवस, जागा ठरवून विविध प्रकारची दुकाने लावली जातात. त्यात भाजी, कपडे, भांडे आणि इतरही अनेक गोष्टी समाविष्ट असतात. इतकीच माहिती आठवडी बाजाराबाबत लोकांना आहे. पण, बाजारात असलेल्या दुकानदारांशी चर्चा केली असता समजले की, त्यांना जागेचे भाडे आणि टॅक्ससुद्धा द्यावे लागते.

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील आठवडी बाजार हा प्रत्येक बुधवारी भरतो. ‘महामनी’ने तेथील विक्रेत्यांशी टॅक्सबाबत चर्चा केली. त्यावेळी विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असे बाजार प्रत्येक गाव आणि शहरातील एका निश्चित ठिकाणी भरत असतात. जिथे हा बाजार भरतो ती जागा स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, नगरपालिकेची असल्याने विक्रेत्यांना त्या जागेचा वापर करण्यासाठी टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स प्रत्येक दुकानदाराकडून वसूल केला जातो. जिथे दर आठवड्याला बाजार भरतो तिथे प्रशासनाकडून विक्रेत्यांना जागांचे वाटप करून दिले जाते आणि या जागेचे प्रशासन भाडे घेते.

Market (1)
ग्रामीण भागात आठवडी बाजार अशा पद्धतीने भरला जातो. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विक्रेत्यांना जागेचे वाटप केले जाते.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता आठवडी बाजारात असते. विविध प्रकारच्या वस्तुंसाठी वेगवेगळ्या भागात जाण्याची गरज नाही. लोक अनेकदा अशा बाजारपेठांमध्ये जाणे पसंत करतात जेथे विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. आठवडी बाजारातही विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असल्याने लोक येथे खरेदीसाठी जातात. त्यामुळे दुकानदार सुद्धा भाडे आणि टॅक्स पावती देण्यास कंटाळा करत नाही. आठवडी बाजारात वस्तू स्वस्त दरात मिळतात कारण या दुकानदारांना भाडे, वीज बिल आणि सरकारी कर हे कमी प्रमाणात द्यावे लागते. टॅक्स पावती आणि भाडे देवून त्यांना हा व्यवसाय परवडतो.

गावाचा विकास आणि इतर कामे करण्यासाठी जो निधी लागतो त्यात टॅक्सची भूमिका महत्त्वाची असते. गावाच्या महसुली हद्दीमध्ये नफा कमवण्यासाठी शासनाव्यतिरिक्त इतर कोणीही इमारती बांधून त्याद्वारे नफा कमवत असेल तर त्यावर प्रशासन कर आकारणी करते. ग्रामपंचायत उत्पन्नाच्या बाबतीत कलम 45 अन्वये अनुसूची एकमधील विविध योजना राबवून प्रशासनाला उत्पन्न वाढवता येते. त्याचबरोबर ग्रामपंचायत उत्पन्नाच्या बाबतीत कलम 126 प्रमाणे आठवडी बाजार व बाजार यावर कर, विशेष कर आकारता येतो. 

भाजी विक्रेते गायनेर सांगतात, आम्ही दर महिन्याला 1200 रुपये जागेचे भाडे आणि दर आठवड्याला 50 रुपये टॅक्स पावती देतो. ही टॅक्स आकारणी प्रत्येक ठिकाणी वेगळी असू शकते. जागा आणि बाजाराचे स्वरूप या दोन बाबींवरून टॅक्स आकारले जातो.