Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Corpus Fund: निवृत्तीसाठी 20 वर्षांत कोट्यवधी रुपयांचा फंड उभारणे शक्य आहे का?

Corpus Fund for Retirement

Corpus Fund: आजकाल सर्वांनाच नोकरीच्या जबाबदारीतून लवकर मुक्त व्हायचं आहे. पण त्यासाठी पुरेसं आर्थिक नियोजन असेल तरच रिटायरमेंटचा विचार करता येऊ शकतो.

कॉर्पोरेट लाईफस्टाईलमुळे फक्त कामाचे आणि पगाराचे स्वरूप बदलले नाही, तर त्यामुळे कामाच्या कालावधीतही बदल झाला आहे. पूर्वी एकदा का नोकरी लागली की त्यातून निवृत्त होईपर्यंत इमानेइतबारे नोकरी केली जात होती. पण आता नोकऱ्यांच्या अनिश्चिततेमुळे आणि स्वत:चा आर्थिक स्तर उंचावरण्यासाठी पटापट नोकऱ्या बदलल्या जात आहेत. त्याचबरोबर आता नोकरीतून लवकर रिटायरमेंट घेण्याचा ट्रेण्ड आला आहे.

नोकरीतून लवकर निवृत्ती म्हणजे वयाच्या 40 वर्षापर्यंत नोकरी करायची आणि त्यानंतरचे आयुष्य रिटायरमेंट घेऊन मस्त जगायचे, असा विचार आता होऊ लागला आहे. पण खरंच हे वाटते तितके सोपे आहे का? आणि घ्यायचीच असेल वयाच्या चाळीशीमध्ये रिटायरमेंट तर काय नियोजन केले पाहिजे, हे आपण जाणून घेणार आहोत.

रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी कोटींचा कॉर्पस फंड

नोकरीच्या कचाट्यातून लवकर सुटका करून घेण्यासाठी निवृत्तीचे चोख नियोजन असणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने पुरेसा निधी हाताशी असणे, सर्वंत महत्त्वाचे! अन्यथा लवकर रिटायरमेंट घेऊन स्वत:चे हाल करण्यात काहीच अर्थ नाही. निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वत:कडे किमान निधी असणे आवश्यक आहे. हा निधी प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवर आधारित असू शकतो. तर आज आपण लवकर रिटायरमेंट घेण्यासाठी कोटींचा कॉर्पस फंड कसा उभारू शकतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

कमी वयात दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य

नोकरीची सुरुवात होते, तेव्हा अल्पकालीन गुंतवणुकीचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. जसे की, पहिल्या नोकरीपासून प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करता येऊ. या एसआयपी कोणताही खंड न पडू देता, ती सलग 20 वर्षे सुरू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक 4 लाख 80 हजार रुपयांची होते. त्यावर मार्केटनुसार किमान परतावा 12 टक्के पकडला तर तुम्हाला परताव्यातून जवळपास 15 लाख रुपये मिळतात. तुमची मूळ गुंतवणूक 4 लाख 80 हजार आणि परतावा 15 लाख असे तब्बल 20 लाख रुपये एसआयपीच्या माध्यामातून जमा होतात.

SIP Calculator

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

एसआयपीच्या रकमेत वाढ

नेहमीच्या 2 हजारांच्या एसआयपीने 20 लाखांचा निधी उभारु शकतो. तर दर 3 वर्षांनी पगारवाढ होते. त्यानुसार एसआयपीच्या रकमेतही वाढ केली पाहिजे. विचार करा 20 वर्षांच्या कालावधीत पगारवाढीची 4 ते 5 वेळा संधी मिळू शकते. यात एसआयपीची रक्कम दुप्पट केली तर त्याचे मूल्यही तीन ते चारपटीने वाढू शकते.

20 हजारांच्या एसआयपीने 2 कोटींचे लक्ष्य शक्य

टप्प्याटप्प्प्याने एसआयपीची रक्कम वाढवल्यास गुंतवणुकीचा ताण येत नाही. अन्यथा प्रत्येक महिन्याला 20 हजारांची एसआयपी सलग 20 वर्षे केली आणि त्यावर त्यावर 12 टक्के परतावा अपेक्षित धरला तर 20 वर्षांनी गुंतवणुकीचे एकूण मूल्य 2 कोटी रुपये होऊ शकते. अशाप्रकारे एसआयपीच्या माध्यमातून निवृत्तीसाठी कोट्यवधी रुपयांची निधी नक्कीच उभारता येऊ शकतो. 

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)