Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund for Child Education: मुलांच्या शिक्षणासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक योग्य आहे का?

Mutual Fund investment for Child's Education

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फायदे आहेत. यातून तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही चांगला निधी उभारू शकता. कसा तो चला पाहुया.

Mutual Fund Investment: मुलांचे शिक्षण ही आता फक्त इच्छा किंवा आकांक्षा राहिलेली नाही. कारण मुलांच्या शिक्षणासाठी सध्या खूप पैसा खर्च करावा लागतो. मूल ज्युनिअर केजी किंवा सिनिअर केजीमध्ये जरी असले तरी त्याचा खर्च हा काही कुटुंबांना न परवडणारा आहे. ते जसेजसे मोठे होते जाते तसे त्याचा खर्चदेखील वाढू लागतो. अशावेळी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी एक मोठा फंड उभा करू शकता.

म्युच्युअल फंडमधून गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. जे तुमच्यासाठी पुरेसा पैसा उभारण्याचे काम करू शकते. यातून तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी एक चांगला निधी उभा करू शकता. पण तो कसा? हे जाणून घेण्यापूर्वी आपण मुलांच्या शिक्षणासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक योग्य आहे का? हे जाणून घेऊ.

म्युच्युअल फंडमधील परतावा पारंपरिक योजनांपेक्षा जास्त

म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा हा नक्कीच सेव्हिंग अकाउंट आणि फिक्सड् डिपॉझिटमधून मिळणाऱ्या जास्त आहे. ही यातील जमेची बाजू आहे. म्युच्युअल फंडमध्ये सर्वसामान्यांनी केलेली गुंतवणूक ही मार्केटमधील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, शेअर्स आणि बॉण्डमध्ये गुंतवली जाते. या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे यातील बरीचशी जोखीम कमी होते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता यातून जास्तीत जास्त परतावा मिळतो. यातील चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीमुळे तुमच्या गुंतवणुकीत सातत्याने वाढ होते. यासाठी तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड निवडणे गरजेचे आहे. जो तुमची ती गरज पूर्ण करेल. तो कसा निवडायचा हे समजून घेऊ.

व्यावसायिक फंड मॅनेजमेंट

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही व्यावसायिक आर्थिक तज्ज्ञांद्वारे केली जाते. ज्यांना मार्केटचा अनुभव असतो. पैसे कधी आणि कोणत्या कंपनीमध्ये गुंतवले पाहिजे. कोणत्या संधीतून जास्तीत जास्त फायदा मिळेल. यासाठी हे तज्ज्ञ दिवस-रात्र काम करतात. अशी चांगली प्रोफेशनल फंड मॅनेज करणाऱ्या टीमचा फंड निवडणे योग्य ठरू शकते. जे तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून त्यातून कंपनीसह तुम्हालाही चांगला फायदा मिळवून देतील.

फ्लेक्सिब्लिटी आणि लिक्विडिटी 

म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत ही फ्लेक्सिब्लिटी आणि लिक्विडिटी असते. म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्ही कधीही काढू शकता. काही योजनांमधून असे गुंतवलेले पैसे लगेच काढता येत नाहीत. पण म्युच्युअल फंडमधील पैसे कधीही काढता येतात आणि ते लगेच खात्यात जमा देखील होतात. गुंतवणूक करताना अशा फ्लेक्सिब्लिटी खूप गरजेची असते. कारण जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा ते काढून वापरता आले पाहिजेत.

वैविध्यपूर्ण गुंतवणूक आणि जोखीम मुक्त

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही वैविध्यपूर्ण गुंतवणूक मानली जाते. कारण या योजनेमध्ये गुंतवलेला पैसा हा सुरक्षित ठिकाणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवला जातो. जेणेकरून त्या फंडावर फक्त नफ्याचा किंवा फक्त तोट्याचा परिणाम दिसून येत नाही. या दोन्ही घटकांची तपासणी करून गुंतवणूकदारांचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला जातो.

टॅक्समध्ये सवलत

म्युच्युअल फंडमध्ये असे काही प्रकार आहेत; जे गुंतवणूकदाराला इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत देतात. अशा फंडांना इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ईएलएसएस फंड म्हणतात. या फंडद्वारे तुम्ही गुंतवणूकही करता आणि त्याचबरोबर टॅक्समध्ये सवलत देखील मिळवू शकता.

एसआयपीद्वारे गुंतवणूक

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) केलेली गुंतवणूक ही नक्कीच तुमच्यासाठी उत्कृष्ट गुंतवणूक ठरू शकते. यामध्ये तुम्ही किमान गुंतवणुकीपासून सुरूवात करू शकता. तसेच तुमच्या बँकेतून नियमित तारखेला आपोआप पैसे स्कीममध्ये जमा होतात. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीची शिस्त लागते आणि दीर्घकाळात तुमच्यासाठी एक भरघोस निधी तयार होतो. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी भरघोस निधी उभा करू शकता. यामध्ये तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तेवढा त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या गुंतवणुकीचा प्रवास आजच सुरू करा.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)