By Kailas Redij27 Feb, 2023 12:103 mins read 188 views
Investment for Pension:निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक चणचण भासू नये, म्हणून तरुण वयातच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. निवृत्तीवेळी भक्कम निधी हवा असल्यास तुम्ही तशा प्रकारे गुंतवणुकीचे नियोजन करणे आवस्यक आहे. दिर्घकाळात जास्त परताव्यासाठी म्युच्युअल फंडाच्या एसआयपीचा पर्याया सोयीस्कर पडतो.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक चणचण भासू नये, म्हणून तरुण वयातच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. निवृत्तीवेळी भक्कम निधी हवा असल्यास तुम्ही तशा प्रकारे गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. दिर्घकाळात जास्त परताव्यासाठी म्युच्युअल फंडाच्या एसआयपीचा पर्याया सोयीस्कर पडतो. वर्षाला 12% परताव्यासाठी वयाच्या 20 व्या वर्षापासून दर महिन्याला 8416 रुपयांची एसआयपी केली तर 60 व्या वर्षी 10 कोटींचा रिटायरमेंट फंड मिळू शकतो. (Start Mutual Fund SIP with Rs 8416 to get 10 crore at the age of 60)
निवृत्तीवेळी 10 कोटींचा रिटायरमेंट फंड हवा असेल तर नियमित दर महिन्याला गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 20 व्या वर्षी किमान 8416 रुपयांची गुंतवणूक करता येईल. वर्षाकाठी सरासरी 12% परतावा धरल्यास 60 व्या वर्षी 10 कोटी मिळतील. गुंतवणूक करताना जसे वय वाढेल तशी एसआयपीची रक्कम देखील वाढेल. उदा. 25 व्या वर्षी निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्याचे ठरवल्यास दर महिन्याला 15396 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याच उद्देशाने जर वयाच्या 30 व्या वर्षी एसआयपी सुरु केल्यास 28329 रुपयांची एसआयपी सुरु करावी लागेल. 35 व्या वर्षी 52697 रुपये आणि 40 वर्षी 100085 रुपयांची एसआयपी केल्यास 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10 कोटी मिळू शकतात. चक्रवाढ परताव्याने मुदतपूर्तीला ही रक्कम 10 कोटींपर्यंत वाढू शकते.
‘या’ पर्यायात गुंतवणूक केल्यास मिळेल 10 कोटींचा निधी
म्युच्युअल फंडात ज्या प्रकारे कमी वयात नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 व्या वर्षी 10 कोटींचा निधी मिळेल. तशाच प्रकारे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन शांती या योजनेतून देखील निवृत्तीसाठीचा निधी उभा करता येऊ शकतो. निवृत्तीनंतर नियमित आर्थिक उत्पन्न सुरु राहण्यासाठी बँकांमध्ये दिर्घकाळ मुदत ठेव करणे किंवा एलआयसी जीवन शांती ही अॅन्युटी योजना सुरु करता येऊ शकते.
दरमहा 1 लाख किंवा 50 हजारांचे पेन्शन
एलआयसी जीवन शांती (प्लॅन 858) नुसार (New LIC Jeevan Shanti Plan) निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 1 लाख किंवा 50 हजारांचे पेन्शन हवे असल्यास किती गुंतवणूक करावी लागेल ते पाहुया. ‘एलआयसी’ने नुकताच जीवन शांती योजनेत (प्लॅन 858) महत्वाचे बदल केलेत. त्यात अॅन्युटी रेट वाढवण्यात आला असून पर्चेस प्राईस बेस्ड इन्सेटीव्हज वाढवण्यात आले आहेत. लवकर रिटायर होण्याचे नियोजन करणाऱ्यांसाठी एलआयसी जीवन शांती एक चांगला पर्याय असल्याचे बोलले जाते. यात निवृत्तीनंतर दरमहा, त्रैमासिक किंवा सहामाही तसेच वार्षिक निश्चित पेन्शन मिळते. सध्या या योजनेत कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. अर्थात जास्त रक्कम गुंतवणूक केल्यास जास्त पेन्शन मिळणार आहे. निवृत्तीनंतर किती रक्कम पेन्शन म्हणून हवी यासाठी ग्राहकांना एलआयसीच्या वेबसाईटवर दिलेल्या कॅल्युलेटरनुसार पडताळता येणार आहे.
व्यक्तिगत एक लाख रुपयांचे पेन्शन हवे असल्यास नवीन जीवन शांती योजनेत 1 कोटींची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एलआयसी कॅल्युलेटरनुसार 60 व्या वर्षापासून दरमहा 1.06 लाख रुपयांचे मासिक पेन्शन मिळू शकते. यात 12 वर्षांचा स्थगिती कालावधी असेल. जर 10 वर्षांचा स्थगिती कालावधी धरल्यास मासिक पेन्शनची रक्कम 94840 रुपये इतकी असेल.
मासिक 50000 रुपयांचे पेन्शन हवे असल्यास एलआयसी जीवन शांती योजनेत एकाच वेळी 50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 12 वर्षांचा स्थगिती कालावधी धरल्यास 60 व्या वर्षानंतर दरमहा 53460 रुपयांचे पेन्शन मिळेल. यात 10 वर्षांचा स्थगिती कालावधी धरल्यास पेन्शनची रक्कम 47420 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.
Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.
Tax Saving Options: चालू आर्थिक वर्ष संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत,जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे वाचवायचे असतील, तर तुमच्याकडे कर बचतीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे, उशीर न करता, काही महत्त्वाची गुंतवणूक ताबडतोब करा, कारण कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.
SIP Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. परंतु मासिक गुंतवणूक हा पर्याय (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूकदारासाठी, गुंतवणूकीच्या कालावधीत दिलेल्या इक्विटी परताव्यामुळे अधिक सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही.