Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Jeevan Labh Policy: दररोज 253 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 54 लाख रुपयांचा परतावा!

LIC Jeevan Labh Policy

LIC Jeevan Labh Policy पॉलिसी 2020 मध्ये लाँच केली गेली आहे. या योजनेत तुम्हाला किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम (Sum Assured) हमखास मिळेल. एलआयसी जीवन लाभ पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र आहेत. 1.5 लाख रुपयापर्यंत या योजनेत कर सवलत दिली जाते.

ही एक नॉन-लिंक्ड आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट सुविधा प्रदान करणारी एक गुंतवणूक पॉलिसी आहे. याचाच अर्थ असा की ही योजना तुम्हांला विमा आणि गुंतवणूक असे दोन्ही फायदे एकत्र मिळवून देते. ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली असून  गुंतवणुकीसाठी या योजनेचा फायदा अनेक लोक घेत आहेत. आयकर कायद्यानुसार या योजनेत गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारकाला कर सवलत देखील दिली जाते. 

पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये 

पॉलिसी टर्म (Policy Term): सदर योजनेत पॉलिसी टर्म पॉलिसीधारक आपल्या इच्छेनुसार निवडू शकतो. या पॉलिसीमध्ये तुम्ही वयाच्या 8 व्या वर्षापासून ते 59 वर्षांपर्यंत पॉलिसी खरेदी करू शकता. पॉलिसीधारक 16 ते 25 वर्षांपर्यंत पॉलिसीचा कालावधी वाढवू शकतो.

प्रीमियम पेमेंट टर्म (Premium Payment Term): प्रीमियम पेमेंट टर्म पॉलिसी टर्मपेक्षा लहान असते आणि पॉलिसीधारकाच्या निवडीवर अवलंबून असते. हा कालावधी 10, 15 किंवा 16 वर्षे इतका असू शकतो. पॉलिसीधारकांनी तो निर्णय घ्यायचा आहे.

जर पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी ही योजना घेतली असेल, तर पालक पॉलिसीमध्ये LIC च्या प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर (Premium Waiver Benefit Rider) निवडू शकतात. पॉलिसी कालावधीत पालक मरण पावल्यास, LIC भविष्यातील प्रीमियम्स माफ करते. याचाच अर्थ पॉलिसी बंद होत नाही आणि पॉलिसी लागू ठेवण्यासाठी पाल्यांना प्रीमियमचा भार सहन करावा लागत नाही.

मृत्यू लाभ (Death Benefits): पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम दिली जाते. मृत्यू लाभामध्ये मृत्यूवरील विम्याची रक्कम तसेच बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस (लागू असल्यास) यांचा समावेश होतो. मृत्यूपश्चात नामनिर्देशित व्यक्तीला मिळणारी विमा रक्कम खालील गोष्टींचा विचार करून ठरवली जाते. या योजनेत तुम्हाला किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम (Sum Assured) हमखास मिळेल. 

1) वार्षिक प्रीमियमच्या 10 पट
2) पॉलिसीधारकाने निवडलेली विमा रक्कम
3) मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% रक्कम

या तीन पर्यायापैकी ज्यात अधिक रक्कम मिळत असेल तो पर्याय विचारात घेऊन नॉमिनीला विमा रक्कम दिली जाते.

मॅच्युरिटी बेनिफिट (Maturity Benefits): पॉलिसीधारक पॉलिसी टर्म संपेपर्यंत जिवंत राहिल्यास, मॅच्युरिटी बेनिफिट दिला जातो. मॅच्युरिटी बेनिफिटमध्ये मॅच्युरिटीवरील विमा रक्कम तसेच  रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस (लागू असल्यास) समाविष्ट आहे.

मॅच्युरिटीवरील विमा रक्कम पॉलिसीधारकाने निवडलेल्या मूळ विमा रकमेइतकीच असते.

बोनस (Bonus): सदर पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकांना लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या नफ्याचा देखील लाभांश मिळतो.या योजनेतील पॉलिसीधारक रिव्हर्शनरी बोनस प्राप्त करण्यास पात्र आहेत.

हा बोनस LIC द्वारे घोषित केला जातो आणि पॉलिसी कालावधी दरम्यानच पॉलिसीधारकाच्या पॉलिसीत जमा केले जातात.

कर्ज सुविधा (Loan Facility): पॉलिसी सुरू झाल्यापासून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारक पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात. कर्जाची कमाल रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर अवलंबून असते.

सरेंडर मूल्य (Surrender Value): पॉलिसीधारकाने मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, सरेंडर मूल्य द्यावे लागते. ही रक्कम भरलेल्या प्रीमियम्सच्या संख्येवर आणि पॉलिसी वर्ष पूर्ण झालेल्या संख्येवर अवलंबून असते.

पर्यायी रायडर्स (Optional Riders): LIC जीवन लाभ योजनेत पॉलिसीधारकाला विविध रायडर्स दिले जातात.  अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा गंभीर आजार यासारख्या विशिष्ट घटनांसाठी अतिरिक्त कव्हरेज दिले जाते.

कर लाभ (Tax Benefits): एलआयसी जीवन लाभ पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र आहेत.  1.5 लाख रुपयापर्यंत या योजनेत कर सवलत दिली जाते. मृत्यू लाभ आणि परिपक्वता लाभ देखील कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहेत.

अशा प्रकारे मिळवा 54 लाख रुपये

समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी LIC ची जीवन लाभ पॉलिसी घेतली. मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळविण्यासाठी, तुम्हाला पॉलिसीची मुदत 25 वर्षे इतकी ठेवावी लागेल. तसेच, तुम्हाला विम्यासाठी 20 लाख रुपयांची रक्कम निवडावी लागेल.

25 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला दरवर्षी 92,400 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.याचाच अर्थ महिन्याला 7,700 रुपये आणि दिवसाला 253 रुपये तुम्ही गुंतवणूक कराल. 25 वर्षानंतर जेव्हा तुमचो पॉलिसी परिपक्व  होईल तेव्हा तुम्हांला सुमारे 54.50 लाख रुपये परतावा मिळेल.