HDFC Bank 7.75% Interest On FD : देशातील गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी एफडीचा पूरेपूर वापर करताना दिसून येत आहे. FD मध्ये लोकांना ठराविक दराने व्याज मिळत राहते. आता एचडीएफसी बँकेने दोन विशेष एफडी लाँच केल्या आहेत. ज्या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतील. एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने स्पेशल एडिशन फिक्स्ड डिपॉझिट सुरू केली आहे. त्यात उच्च एफडी दर 35 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.20% आणि 55 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.25% लागू केले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या एफडीवर 0.50% अतिरिक्त लाभ मिळेल.
एचडीएफसी बँकेचे नवीन व्याजदर
HDFC बँक आता 29 मे 2023 पर्यंत 7 ते 29 दिवसांच्या FD वर 3% व्याज दर देत आहे. 30 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.50% व्याज दर देत आहे. तर 46 दिवस आणि सहा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.50% व्याज दर देत आहे. बँक सहा महिने-एक दिवस ते नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी 5.75% व्याज दर देते. नऊ महिने-एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी बँक 6% व्याज दर देऊ करीत आहे.
एचडीएफसी बँकेची योजना
HDFC बँक आता एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 6.60% व्याजदर आणि 15 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.10% व्याजदर देते. तर 18 महिने ते 2 वर्षे 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 7% व्याजदर देत आहे. HDFC बँकेने 35 महिन्यांच्या कालावधीची FD एक विशेष योजना सादर केली आहे,जी नियमित नागरिकांसाठी 7.20% व्याज दर देते. तर 4 वर्ष 7 महिन्याच्या कालावधीसाठी 7.25% व्याज दर देते. तसेच 55 महिन्यांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरीकांना 7.75 % व्याज देणार आहे. बाकी इतर स्किमवर 7% व्याजदरच दिले जाते.