Child Gift Mutual Plan : मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी निव्वळ आई-वडिलांचा जीवन विमा वा गुंतवणूक असून फायदा नाही. तर मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च पूर्ण करण्यासाठी त्यासाठी आत्तापासूनच योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याची गरज आहे. मुलांच्या शिक्षणाच्या तरतूदीसाठी म्युच्युअल फंडमध्ये चाईल्ड गिफ्ट म्युच्युअल फंडचा पर्याय आहे. पाहुयात काय आहे का प्लान.
चाईल्ड गिफ्ट म्युच्युअल फंड
आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण म्युच्युअल फंडच्या विशेष अशा चाईल्ड गिफ्ट म्युच्युअल फंड प्लान मध्ये गुंतवणूक करू शकतो. ही गुंतवणूक करताना आपला उद्देश हाच असतो की, या गुंतवणूकीतून मुलांचं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं. त्यासाठी आपण जास्त काळासाठी म्हणजे 5, 10 ते 15 वर्ष वा त्याहुन अधिक वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो. या म्युच्युअल फंडमध्ये आपण खातं खोलल्यावर सुरूवातीला जर आपण 5 वर्षाचा कालावधी ठरवला असेल तरी नंतर त्यामध्ये आपण सहज बदल करून गुंतवणूकीचा कालावधी वाढू अथवा कमी करु शकतो.
या फंडमध्ये आपण एकाहून अधिक अपत्यांच्या नावाने जॉइन खातं सुरू करू शकतो. मुलांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलांना समान हिस्स्यामध्ये जमा निधीचं वाटप केलं जातं. या फंडचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे या फंडमध्ये मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, यासाठी कंपनीने ठरवलेल्या निकषांसाठी पात्र ठरावे लागते.
या गुंतवणुकीमध्ये मिळणारे रिटर्न्स
या गुंतवणूकीवर आपल्याला सर्वसाधारणपणे 10 ते 12 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. हे व्याज नियमित आपल्या खात्यावर जमा होते. जे की, फंड मॅनेजर विविध भांडवली बाजार, रोखे आणि गर्व्हमेंट सेक्युरिटीमध्ये गुंतवतात. ज्यामुळे आपल्या गुंतवणूकीच्या मॅच्यूरिटी वर्षानंतर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात.
गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
- चाईल्ड गिफ्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण जर 10 किंवा 15 वर्षाहून अधिक काळासाठी जर गुंतवणूक करत असू तर त्यासाठी आपल्या गुंतवणूकीमध्ये नियमितता ठेवणे खूप गरजेचे आहे.
- या गुंतवणूकी अंतर्गत खातं खोलण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
- या प्लानमध्ये गुंतवणूक करताना यामधुन मिळणाऱ्या रिटर्नचा विचार आपण जरूर करत असतो. तर इतर म्युच्युअल फंड प्लाननुसार या प्लानचे रिटर्न्स सुद्धा त्यावेळच्या बाजारभावानुसार असणार आहेत. तेव्हा ज्या कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवणार आहोत त्याचे पूर्वीचे आर्थिक अहवाल तपासून त्यानुसार गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.
- यामध्ये गुंतवणूक करताना असेट अलोकेशन या मुद्दावर सुद्धा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आपल्याला इक्विटी फंडमध्ये किती टक्के गुंतवायचे आहेत आणि डेब्ट फंडमध्ये किती टक्के गुंतवायचे आहेत यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. यासाठी आपल्या ए़जंट सोबत सविस्तर चर्चा करून कंपनीचे पूर्वीचे अहवाल, भांडवली बाजारातील आताचे स्थान अशा इतरही मुख्य बाबींवर विचार करून निर्णय घ्यावा.