Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Calculator: स्मॉल कॅप फंडमध्ये मासिक 5 हजार गुंतवा अन् निर्माण करा 25 लाखांचा कॉर्पस फंड

SIP Calculator

SIP Calculator: म्युच्युअल फंडमधील स्मॉल कॅप फंडने मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून एकच भरीव असा कॉर्पस फंड निर्माण करू शकता.

SIP Calculator: म्युच्युअल फंडमधील स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची संपत्ती मागील 10 वर्षात चांगलीच वाढली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (Association of Mutual Fund in India-AMFI) वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार काही निवडक स्मॉल कॅप फंडांनी 25 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिला आहे.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना ती डायरेक्ट आणि रेग्युलर अशा दोन पद्धतीने करता येते. या दोन्हीतून मिळणारा परतावा हा थोड्याफार प्रमाणात वेगवेगळा असतो. जसे स्मॉल कॅप फंडामध्ये डायरेक्ट प्लॅनमधून केलेल्या गुंतवणुकीवर मागील 10 वर्षात 25 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. तर रेग्युलर प्लॅनमधून 23 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

एसआयपी कॅल्क्युलेटरमधून तुम्ही हे पाहू शकता की, प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक केलेल्या निवडक स्मॉल कॅप फंडमध्ये सलग 10 वर्षांच्या गुंतवणुकीतून 25 लाखापेक्षा जास्त कॉर्पस फंड तयार झाला आहे. मासिक 5 हजारांच्या एसआयपीने 10 वर्षात 6 लाखांची गुंतवणूक होते. त्यावर किमान 12 टक्क्यांचा परतावा गृहित धरला तर 6 लाखावर 5 लाख 61 हजार रुपये रिटर्न्स मिळतात आणि या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य 11 लाख 61 हजार रुपये होते.

SIP CALCULATOR

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

अॅम्फीवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्मॉल कॅपमधील काही फंडांनी 23 ते 25 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. त्यानुसार या स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे मूल्य 25 लाखापर्यंत पोहोचले आहे. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखीमयुक्त गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे यावर निश्चित एवढाच परतावा मिळेल, हे सांगता येत नाही. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

DSP Samll Cap Fund

डीएसपी स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना 26.96 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 26.03 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Franklin India Smaller Companies Fund

फ्रॅन्कलीन इंडिया स्मॉलर कम्पनीज फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून 24.55 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 23.25 टक्के रिटर्न्स दिले आहेत. हा परतावा मागील 10 वर्षात दिला आहे.

Kotak Small Cap Fund

कोटक म्युच्युअल फंड हाऊसमधील स्मॉल कॅप फंडाने मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना डायरेक्ट प्लॅनमधून 25.59 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर रेग्युलर प्लॅनमधून 23.93 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Nippon India Small Cap Fund

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाने डायरेक्ट प्लॅनमधून मागील 10 वर्षात 31.20 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर रेग्युलर प्लॅनमधून 29.95 टक्के रिटर्न्स दिले आहेत. निप्पॉन इंडियाच्या स्मॉल कॅप फंडमध्ये डायरेक्ट प्लॅनमधून मासिक 5 हजारांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मूल्य 10 वर्षांनी 41 लाख रुपये झाले.

SBI Small Cap Fund

एसबीआय स्मॉल कॅप फंडातून गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत 28 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर रेग्युलर प्लॅनमधून 27.26 टक्के रिटर्न्स आले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी एसबीआयमध्ये 5000 एसआयपी सुरू केली होती. त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य अंदाजित 34.4 लाख झाले आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)