Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NRO Saving Account: एनआरओ खात्यांवरील व्याजदर वाढवले, कोणती बँक किती व्याज देतेय?

Interest rate hiked on NRO accounts

Revised interest rates on NRO accounts: एनआरआयसाठी असलेल्या एनआरओ बचत खात्यांचे व्याजदर बदलण्यात आले आहेत. अनेक बँकांनी या खात्यांच्या चालू रक्कमेवरील व्याजदरात सुधारणा केली आहे, हे नवे व्याजदर काय आहेत, याबाबत सविस्तर पुढे वाचा.

What is the interest rate of NRO account: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका सतत विविध बचत योजना आणत असतात. सध्या अनेक बँकांनी एनआरओ (NRO: Non Resident Ordinary) बचत खात्यातील रकमेवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. एसबीआय (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB Bank) आदी बँकांनी एनआरोच्या बचत खात्यातील (Saving Account) रक्कमेवर व्याजदर बदलले आहेत.

एनआरओ बचत खाते हे एनआरआय व्यक्तीच्या नावाने भारतात उघडलेले एक बँक खाते आहे, जे त्याने भारतात कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन करते. अशा खातेदारांना बँकेने जमा केलेल्या रकमेवर वार्षिक व्याजदरासह लाभांशचा लाभ घेता येतो. सर्व बँका एनआरओ खात्यातील रकमेवर निश्चित व्याजदर देतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या एनआरओ खातेधारकांसाठी सध्याच्या रकमेवर व्याजदर निश्चित केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, 10 कोटींपेक्षा कमी रकमेवर 2.70 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर 10  कोटींहून अधिक रकमेवर 3 टक्के व्याज दिले जाणार आहे.

एचडीएफसी बँक (HDFC Bank) एनआरओ खात्यावरील व्याजदरासाठी विद्यमान रकमेवर व्याजदराच्या दोन श्रेणी देते. बँकेच्या म्हणण्यानुसार, जर खातेदाराच्या खात्यात 50 लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर त्याला 3 टक्के व्याज मिळते. तर, 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 3.50 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) एनआरओ खातेधारकांना सध्याच्या 50 लाखांपेक्षा कमी रकमेवर 3 टक्के व्याजदर देते. तर, खात्यात 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास 3.5 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या एनआरओ खातेधारकांना सध्याच्या 10 लाखांपेक्षा कमी रकमेवर 2.70 टक्के व्याजदर देते. तर, खात्यात 10 लाख ते 100 कोटी रुपये असल्यास 2.75 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.