Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance versus tobacco: स्मोकिंग करता पण इन्शुरन्स हवाय, जाणून घ्या विमा कंपन्यांचे नियम

Insurance Policy

Insurance versus tobacco: तुम्ही नवीन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रपोजल सादर करता, तेव्हा तुम्ही मागील १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये निकोटीनचे सेवन (कोणत्याही स्वरूपात) केले आहे किंवा नाही, ह्याचे व्हेरिफिकेशन करण्याचा इन्शुरन्स कंपनीला अधिकार आहे. तुम्हाला “नॉन-स्मोकर”चे स्टेटस मिळण्यासाठी किमान एक वर्ष निकोटीनमुक्त असणे आवश्यक आहे.

Cigarette smoking is injurious to health. हा वैधानिक इशारा प्रत्येक सिगारेट फ्लेक्सवर, माध्यमातील जाहिरातीमध्ये, बस स्टॉप वर, पान-पट्टीवर, अगदी विकत घेतलेल्या प्रत्येक सिगारेट पाकिटावर प्रिंटेड स्वरूपात असतो. Movie पाहायला थिएटरमध्ये गेलेला आपल्यापैकी प्रत्येकजण “ओरल कॅन्सर-ग्रस्त मुकेश”ला ओळखतो. औपचारिक चर्चा असोत, अनौपचारिक बैठका असोत वा ग्रामीण गप्पांचे फड असोत, चंचीपासून ते हुक्क्यापर्यंत (सिगार, सिगारेट, विडी, चिरूट) तंबाखू उपस्थित असतेच. तंबाखूच्या सवयीसंबंधीचा वैधानिक इशारा व्यसन करणारी व्यक्ती कदाचित गांभीर्याने घेत नसेलही, परंतु इन्शुरन्स कंपन्या मात्र तंबाखू किंवा टोबॅको व्यसनाला मायक्रोस्कोपखाली बघत असतात.

तुम्ही नवीन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रपोजल सादर करता, तेव्हा तुम्ही मागील १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये निकोटीनचे सेवन (कोणत्याही स्वरूपात) केले आहे किंवा नाही, ह्याचे व्हेरिफिकेशन करण्याचा इन्शुरन्स कंपनीला अधिकार आहे. तुम्हाला “नॉन-स्मोकर”चे स्टेटस मिळण्यासाठी किमान एक वर्ष निकोटीनमुक्त असणे आवश्यक आहे. नियमित धूम्रपान करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि कव्हरेजसाठी प्रीमियम निश्चित करण्यासाठी इन्शुरर तुम्हाला मेडिकल टेस्ट करून घेऊन योग्य ते “नॉन-स्मोकर” असल्याचे सर्टिफिकेट सादर करायला सांगू शकतो.  तुमच्या तंबाखू-सेवनाच्या सवयी इन्शुरन्स कंपनीला तुमच्या मेडिकल चेक-अपमधून समजू शकतात. निकोटीनचे ट्रेस तुमच्या रक्त, मूत्र, केस आणि लाळ (blood, urine, hairs & saliva) मध्ये शोधले जाऊ शकतात. काही इन्शुरर्स तर तुमच्या “नॉन-स्मोकिंग” स्टेट्ससाठी मागील पाच वर्षे निकोटीन-मुक्त असण्याची शर्त समोर ठेवतात.

टोबॅको ही केवळ आरोग्यावरच नाही, तर आपल्या आर्थिक गणितावरदेखील परिणाम करत असतेच. इन्शुरर “स्मोकर” श्रेणीमध्ये येणाऱ्या पॉलिसी-इच्छुकांचे क्लासिफिकेशन खालीलप्रमाणे करतो आणि त्यानुसार “प्रिमिअमचा दर” आकारतो -

श्रेणी /  Category  

धूम्रपान आणि आरोग्य विषयक समस्या

प्रिमिअमचा दर ( Rate) 

Preferred Smoker  

धूम्रपान करतातमात्र तंदुरुस्त असतात

कमी दर आकारला जातो

Typical Smoker  

धूम्रपान करतातकिरकोळ परंतु प्रदीर्घ असणारी आरोग्य समस्या

जास्त प्रिमिअम भरावा लागतो

Table-rated Smoker  

धूम्रपान करतात. आरोग्य-विषयक समस्या स्पष्ट दिसून येतात.

जास्त रिस्क. प्रिमिअमचा दर खूप जास्त असतो.


विमा खरेदी करीत असताना तुमच्या निकोटीन-सेवनाबाबतची माहिती तुम्ही इन्शुरर पासून लपविलीत किंवा खोटी सादर केलीत, तर इन्शुरर तुमचे प्रपोजल नाकारू देखील शकतो. पॉलिसी खरेदीच्या वेळी केल्या गेलेल्या आरोग्य तपासणी दरम्यान तुमच्या रक्तात निकोटीन आले नाही, मात्र तुम्ही हयात असताना इन्शुरन्स कंपनीला तुमच्या स्मोकिंग हॅबिट्सची माहिती मिळाली, तरी देखील ती एक तांत्रिकदृष्ट्या फसवणूक आहे. तुम्ही धूम्रपान करीत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यास काही इन्शुरर्स त्यांच्या स्टॅंडर्ड प्रोसेसला अनुसरून तुमची  पॉलिसी रि-अंडरराइटिंगला पाठवू शकतात. तेव्हा तुम्ही धुम्रपान करत असाल, तर तुम्ही हे  सत्य इन्शुरन्स कंपनीला सांगणे आवश्यक आहे. अशा वेळी तुम्ही “स्मोकिंग”साठी तुलनेने  सर्वात कमी प्रिमिअम आकारणारी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता.

समजा, तुम्ही आधीच टर्म इन्शुरन्स खरेदी केलेला असेल आणि नंतरच्या काळात धूम्रपान सूरु केले असल्यास तसे इन्शुरन्स कंपनीला कळविणे अनिवार्य नाही. मात्र, तरी देखील, भविष्यातील तुमच्या नॉमिनीला येऊ शकणाऱ्या संभाव्य समस्या लक्षात घेऊन प्रामाणिक असणे केव्हाही उत्तम.  कारण प्रत्यक्ष क्लेम-प्रोसेसच्या टप्प्यावर काही प्रश्न इन्शुररकडून उपस्थित केले जाऊ शकतात. त्यावेळी तुमच्या नॉमिनीला त्याचा त्रास होऊ शकतो, क्लेम मान्य होण्यास आणि पे-आउटला विलंब होऊ शकतो. त्यामुळे एकदा तुम्ही इन्शुरन्स कंपनीला नव्याने चालू केलेल्या धुम्रपानाबाबत कळविणे, योग्य राहील. इन्शुरर तुमची पॉलिसी पुढे चालू ठेवू शकतो किंवा तिचे पुनर्मूल्यांकन करून तुमचा प्रीमियम वाढवू शकतो.

काही प्रकरणी, तुम्हाला पॉलिसी दिली गेल्यानंतर तुम्ही दीर्घकाळापर्यंत स्मोकिंग थांबवलेले असेल, तर प्रिमिअमचे दर तुमच्या “प्रिमिअम रेटिंग”च्या पुनर्विचार याचिकेला अनुसरून प्रत्यक्षात कमी देखील केले जातात. Aegon लाईफ इन्शुरन्स सारखी कंपनी तर, ‘It Pays to Quit Smoking’ सारख्या धोरणांतर्गत “iTerm टर्म इन्शुरन्स पॉलिसी” खरेदी केल्यानंतरच्या दुसऱ्या पॉलिसी वर्षापासून धूम्रपान सोडल्यास Renewal Premium वर सवलत देते.

तेव्हा जर तुम्ही “नॉन-स्मोकर” प्रिमिअम-दरासाठी पात्र असाल, तर तुम्ही मागील १२ महिन्यांपासून धुम्रपान न करणाऱ्या जाहीरनाम्यावर (Non-smoking Declaration) लिहून देऊ शकता की, तुम्ही यापुढे सिगारेट, सिगार, च्युइंग टोबॅको, निकोटीन पॅच यांचे सेवन किंवा धूम्रपान करणार  नाही. मात्र इन्शुरन्स कंपनीला “स्मोकिंग-हॅबिट्स” बाबत फसविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा धूर (smoke) इन्शुरन्स कंपनीच्या नाकापर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही, हे मात्र खरे.