Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instagram Update : इन्स्टाग्रामने आणलं Quiet Mode फीचर!

Instagram Update

इन्स्टाग्रामवर युजर्ससाठी (Instagram Users) एक नवीन फीचर आलं आहे, ज्याचं नाव क्वाइट मोड आहे. काय आहे क्वाइट मोड? वापरकर्त्यांना त्याचा कसा फायदा होणार? हे आज पाहूया.

इन्स्टाग्रामने युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामध्ये इन्स्टाग्रामने तरुणांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आजच्या काळात, बहुतेक तरुण आपला वेळ फक्त इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवतात. दिवसातील किती वेळ ते इन्स्टाग्रामवर फ्रेंड्स आणि फॉलोअर्सना देत आहेत, याचे भानही तरुणांना नसते. हे देखील त्यांच्या विचलित होण्याचे अनेक वेळा कारण बनते. अशात आता युजर्ससाठी मित्र आणि फॉलोअर्ससोबत त्यांच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिमिट सेट करण्यास मदत करेल. यासाठी इन्स्टाग्रामने Quiet Mode (क्वाइट मोड) हे नवीन फीचर आणले आहे.

सेंडरला जाणार मेसेज

या फीचरचा उद्देश तरुणांना मदत करणे हा आहे. यामध्ये युजर सर्व नोटिफिकेशन्स थांबवू शकतो आणि त्यांची प्रोफाईल अॅक्टिव्हिटी स्टेटस क्वाइट मोड (Quiet Mode) मध्ये बदलू शकतो. यादरम्यान जर कोणी कॉन्टॅक्ट डायरेक्ट मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत असल्यास इन्स्टाग्राम (Instagram) ऑटोमॅटिकली सेंडरला सूचित करते. या प्रकरणात, सेंडरला एक ऑटो-मॅसेज पाठविला जातो की क्वाइट मोड (quiet Mode) सक्रिय आहे.

नव्या फीचरचे वैशिष्ट्य

सध्या, हे वैशिष्ट्य यूएस, यूके, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. हा बदल वापरकर्त्यांसाठी त्यांच्या ऑनलाइन अनुभवावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामच्या नवीन फीचरमध्ये तरुण इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवतात आणि ते कोणत्या प्रकारचे कंटेंट पाहतात यावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. भविष्यात, हे वैशिष्ट्य प्रत्येकासाठी आणले जाऊ शकते.

असा आहे क्वाइट मोड

वैशिष्ट्य

क्वाइट मोड हे इन्स्टाग्रामवरील एक नवीन वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्यांना सर्व नोटिफिकेशनला थांबवू शकते आणि त्यांच्या प्रोफाइलची अँक्टिव्हिटी स्थिती क्वाइट मोडमध्ये स्विच होईल.

असा अँक्टिव्ह करा क्वाइट मोड

हे वैशिष्ट्य तुमच्या प्रदेशात उपलब्ध असल्यास, तुम्ही तुमच्या फोनवरील इन्स्टाग्राम सेटिंग्जमध्ये जाऊन आणि क्वाइट मोड पर्याय निवडून ते एनेबल करू शकता.

क्वाइट मोड एनेबल केल्यानंतर...

तुम्ही क्वाइट मोड एनेबल करता तेव्हा, सर्व सूचना थांबवल्या जातील आणि तुमची प्रोफाइल अँक्टिव्हिटी क्वाइट मोडवर स्विच होईल. दरम्यान, जर कोणी तुम्हाला डायरेक्ट मेसेज पाठवला, तर इन्स्टाग्राम आपोआप त्यांना क्वाइट मोड अँक्टिव्ह असल्याचा मेसेज पाठवते.