Misal Pav Best Vegetarian Food : अलीकडेच फूड गाइड प्लॅटफॉर्म टेस्ट अटलास (Taste Atlas) वेबसाईटने जगातील सर्वोत्तम वेगन पदार्थ आणि दर असलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मिसळ पावने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जगातल्या सर्वात चांगल्या पारंपारिक वेगन पदार्थांमध्ये मिसळपावने 11 वे स्थान पटकावले आहे.
Table of contents [Show]
जगात 11 व्या क्रमांकावर मिसळपाव
भारतातून सुमारे सात भारतीय पदार्थांना टॉप 50 यादीत स्थान मिळाले आहे. त्यात प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ, मिसळ पाव भारतातून अव्वल स्थानावर आहे आणि जगातील सर्वोत्तम पारंपारिक वेगन पदार्थांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी 2015 मध्ये, लंडनमधील फूडी हब अवॉर्ड्समध्ये देखील मिसळ पावला जगातील सर्वात चवदार शाकाहारी पदार्थ म्हणून नाव देण्यात आले होते.
मिसळची विविध नावे
मुंबईतील आस्वाद, श्री दत्त स्नॅक्स, ममलेदार मिसळ आणि विनय हेल्थ होम,ठाण्याची मामलेदार मिसळ, नाशिकचे साधना रेस्टॉरेंट, पुण्यातील शिंदे बंधूची प्रांजल मिसळ, वडगावची प्रसिध्द मटकी मिसळ ही महाराष्ट्रातील काही चवदार मिसळ मिळणारी प्रसिध्द ठिकाणे आहेत. नाशिकची अण्णा मिसळ प्रसिध्द आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 50 रुपयांपासुन ते 1000 रुपये प्लेट पर्यंत मिसळपावचे दर आहेत.
विविध ठिकाणी विविध दर
मुंबईतील आस्वाद, श्री दत्त स्नॅक्स, ममलेदार मिसळ आणि विनय हेल्थ होम, नाशिकचे साधना रेस्टॉरेंट, पुण्यातील शिंदे बंधूची प्रांजल मिसळ, वडगावची प्रसिध्द मटकी मिसळ ही महाराष्ट्रातील काही चवदार मिसळ मिळणारी प्रसिध्द ठिकाणे आहेत. नाशिकची अण्णा मिसळ प्रसिध्द आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 50 रुपयांपासुन ते 1500 रुपये प्लेट पर्यंत मिसळपावचे दर आहेत. पुणे येथे 70 रुपयांपासुन 1000 रुपयांपर्यंत मिसळचे दर आहेत. तर नाशिक येथे 40 रुपयांपासुन 600 रुपयांपर्यंत मिसळचे दर आहेत. मिसळचे दर ठिकाण आणि चवीनुसार प्रत्येक शहरात बदलतात.
वेगन फूड म्हणजे काय?
पशुपक्ष्यांपासून मिळणारे पदार्थ उदा. चिकन, मांस, मच्छी, दूग्धजन्य पदार्थ, मध, अंडी आणि अॅनिमल फॅट्स, मशरुम यांच्या वगळून तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना वेगन फूड म्हणून ओळखले जाते. वेगन आणि शाकाहारी यात फरक आहे. शाकाहारी आहारात प्रामुख्याने भाजीपाला, दूग्धजन्य पदार्थ,मशरुम आदी खाद्यपदार्थांचा समावेश होतो.