Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Foreign Exchange Reserves : महिन्याभरातल्या नीचांकी पातळीवर आला भारताचा परकीय चलन साठा, काय कारणं?

Foreign Exchange Reserves : महिन्याभरातल्या नीचांकी पातळीवर आला भारताचा परकीय चलन साठा, काय कारणं?

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलनसाठ्यात घट झालीय. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) जी आकडेवारी दिलीय, त्यानुसार मे महिन्यात सलग दुसऱ्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्याचं समोर आलंय.

भारताच्या परकीय चलनसाठ्यात 26 मेपर्यंत 589.14 अब्ज डॉलर इतक्या नीचांकी पातळीवर घसरला. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.34 अब्ज डॉलरनं घसरण झाल्याचं समोर आलंय.19 मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 6.05 अब्ज डॉलरनं घसरला होता. तर ही तीन महिन्यांहून अधिक काळातली सर्वात मोठी घसरण आहे. डॉलरच्या संदर्भात व्यक्त केलेल्या परकीय चलन मालमत्तेतला बदल आणि आरबीआयच्या राखीव ठेवींमध्ये असलेल्या इतर चलनाच्या मूल्यवृद्धी किंवा अवमूल्यनाचा परिणाम यांचा समावेश होतो. टीव्ही 9नं याविषयीचं वृत्त दिलंय.

ऑक्टोबर 2021मध्ये होता उच्चांकी पातळीवर

परकीय चलनाच्या साठ्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताच्या रिझर्व्ह ट्रेंच सिच्युएशनचा समावेश होतो. ऑक्टोबर 2021मध्ये ते प्रमाण आतापर्यंतचं उच्चांकी पातळीवर होतं. ऑक्टोबर 2021मध्ये, भारताचा परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलरसह आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर होता. 31 मार्च 2023 रोजी भारताचा परकीय चलन साठा 578.4 अब्ज डॉलर होता. 26 मे अखेर भारताचा परकीय चलन साठा 589.138 अब्ज डॉलर होता. 26 मेला संपलेल्या आठवड्यात रुपया 0.1 टक्के वाढला. 82.5575 ते 82.8500 या दरम्यान व्यापार झाला. शुक्रवारी, रुपया 82.3050 वर बंद झाला.

सोन्याचा साठा 44.902 बिलियनवर 

सोन्याचा साठा 44.902 बिलियनवर घसरलाय. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा साठा 225 दशलक्षनं घसरून 44.902 अब्ज डॉलर झालाय. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) 84 दशलक्षानं कमी होऊन 18.192 अब्ज डॉलर झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाधीन आठवड्यात आयएमएफमधल्या देशाची राखीव स्थिती 170 दशलक्षानं घसरून 5.113 अब्ज डॉलर झालीय.

रुपयाची घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात घसरण होतेय. ही घसरण रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक स्पॉट आणि फॉरवर्ड मार्केटमध्ये हस्तक्षेप करते. राखीव रकमेतला बदल हा मूल्यांकन नफा किंवा तोट्यामुळे होतो, असं मागेच रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. रॉयटरच्या वृत्तानुसार, विदेशी मुद्रा बाजारातल्या सहभागींनी सांगितलं, की रुपया डॉलरच्या तुलनेत 83च्या खाली जाण्यापासून रोखण्यासाठी आरबीआय डॉलरची विक्री करतेय.  मागच्या आठवड्यात, रुपया डॉलरच्या तुलनेत किरकोळ जास्त होता, आशियाई स्पर्धकांना मागे टाकत 82.6100 ते 82.8525 या दरम्यान व्यापार केला.

वर्षाच्या सुरुवातीलाही घसरला होता साठा

परकीय चलनाचा साठा या वर्षाच्या सुरुवातीलाही घसरला होता. जवळपास 1.3 अब्ज डॉलरची घसरण त्यावेळी पाहायला मिळाली होती. त्यावेळी परकीय चलन साठा 561.583 अब्ज डॉलर झाला होता. तर 30 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.