Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

International trips from India: परदेश दौऱ्यावर भारतीय दर महिन्याला एक अब्ज डॉलर्स खर्च करतात, RBI चा अहवाल!

Tourism

Image Source : www.logos.fandom.com

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, 2021-22 या कालावधीत परदेश दौऱ्यावर भारतीयांनी सुमारे $4.16 अब्ज एवढा खर्च केला आहे. कोविड महामारीपूर्वी, 2019-20 च्या याच कालावधीत हा आकडा $5.4 अब्ज इतका होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या वस्तूवर सात अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले.

परदेश दौऱ्यावर भारतीय दर महिन्याला एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करत आहेत. हा आकडा कोविड महामारीपूर्वीच्या काळापेक्षा खूप जास्त आहे. भारतीय रहिवासी व्यक्तींनी प्रवासासाठी उदारीकृत रेमिटन्स स्कीम (Liberalised Remittance Scheme ) अंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एप्रिल-डिसेंबर दरम्यान इतर देशांमध्ये $9.95 अब्ज रुपये पाठवले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या याच कालावधीत हा खर्च $4.16 अब्ज इतका प्रचंड होता. कोविड महामारीपूर्वी, 2019-20 च्या याच कालावधीत हा आकडा $5.4 अब्ज इतका होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या परदेशी दौऱ्यावर भारतीय नागरिकांनी सात अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.

V3Online चे सपन गुप्ता याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “ आता भारतीय त्यांच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह जगभर प्रवास करत आहेत. व्हिएतनाम, थायलंड, युरोप आणि बाली ही काही प्रमुख ठिकाणे आहेत जी भारतीय लोक पसंत करतात” त्यांनी पुढे सांगितले की, याशिवाय युरोप, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि दुबईचाही भारतीयांच्या पसंतीत समावेश आहे.

संकशचे सह-संस्थापक आकाश दहिया माध्यमांशी बोलताना म्हणाले की, परवडणारा प्रवास आणि तांत्रिक प्रगतीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास आता वाढत आहे. ते म्हणाले, “आमच्या पोर्टफोलिओमधील  75% टक्के लोक आता आंतरराष्ट्रीय प्रवासाची निवड करत आहेत. युरोप, बाली, व्हिएतनाम आणि दुबईसारख्या ठिकाणांसाठी भारतीयांमध्ये मागणी वाढत आहे.

दरम्यान, सर्वसाधारण अर्थसंकल्पात, सरकारने परदेशी टूर पॅकेजेसवरील कर संकलन (Tax Collected at Source) दर चालू पाच टक्क्यांवरून पुढील आर्थिक वर्षापासून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे भारतीयांच्या परदेश प्रवासावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या कर संकलनामुळे भारतीयांना विदेशी प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. येत्या काळात परदेशी वारी महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने ‘स्वदेशी यात्रा’ ला महत्व दिले आहे. देशभरातील 50 तीर्थस्थळे सरकारद्वारे पर्यटनासाठी सुसज्ज करण्याची सरकारची योजना आहे. देशांतर्गत पर्यटन वाढावे आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी हा यामागील हेतू आहे. याचाच भाग म्हणून परदेशी टूर पॅकेजेसवरील कर संकलन म्हणजेच TCS वाढवला असल्याची चर्चा पर्यटन क्षेत्रात आहे. भारतीय पर्यटक आंतरराष्ट्रीय सहलीचा पर्याय का निवडतात याची अनेक कारणे आहेत:

अनुभवांची विविधता (Diversity of experiences): अनेक भारतीय पर्यटक आंतरराष्ट्रीय स्थळांकडे आकर्षित होतात कारण ते भारतात उपलब्ध नसलेल्या विविधतेचा आनंद त्यांना घ्यायचा असतो. उदाहरणार्थ, पर्यटकांना विविध पाककृती एक्सप्लोर करण्यात, विविध संस्कृतींचा अनुभव घेण्यात किंवा प्रतिष्ठित अशी पर्यटनस्थळे  पाहण्यात स्वारस्य असते.

उत्तम पायाभूत सुविधा (Better infrastructure): भारतात पर्यटन उद्योग झपाट्याने वाढत असताना, अजूनही पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेशी संबंधित काही आव्हाने आहेत जी आंतरराष्ट्रीय स्थळे अधिक आकर्षक बनवू शकतात. चांगल्या विकसित वाहतूक व्यवस्था, विश्वसनीय आरोग्य सुविधा आणि मजबूत पर्यटन पायाभूत सुविधा असलेल्या स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. त्यामुळे परदेशी पर्यटन हा पर्याय ते निवडतात.

परवडणाऱ्या सहली (Affordability): आंतरराष्ट्रीय प्रवास महाग असू शकतो, परंतु भारतीय पर्यटकांसाठी परवडणारे पर्याय उपलब्ध करणारी अनेक ठिकाणे आहेत. कमी किमतीच्या प्रवासाच्या योजना आणि बजेटमध्ये राहण्याच्या सोयीमुळे, भारतीयांना आता विविध आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर प्रवास करणे शक्य झाले आहे.

शैक्षणिक संधी (Educational opportunities): अनेक भारतीय पर्यटकांना शैक्षणिक पर्यटनामध्ये रस असतो, ज्यामध्ये विशिष्ट विषय किंवा कौशल्य जाणून घेण्यासाठी ते इतर देशांना भेट देणे पसंत करतात. उदाहरणार्थ, त्यांना एखाद्या भाषेचा अभ्यास करण्यात, संशोधन करण्यासाठी किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे अन्वेषण करण्यात स्वारस्य असू शकते, त्यामुळे देखील लोक परदेशी दौऱ्यावर जाणे पसंत करतात.

नित्यक्रमातून ब्रेक (Escape from routine): शेवटी, काही भारतीय पर्यटक त्यांच्या दैनंदिन दिनचर्येतून विश्रांती घेण्यासाठी आणि काहीतरी नवीन आणि वेगळे अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करणे निवडतात. यात साहसी प्रवास, समुद्रकिना-यावरील सुट्ट्या किंवा इतर प्रकारच्या विश्रांती उपक्रमांचा समावेश आहे.