Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indians Investment Habits : भारतीयांच्या गुंतवणूकीच्या सवयी बदलत आहेत

Indians Investment Habits

स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात भारताने खूप प्रगती केली असून भारतीयांचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांनी गुंतवणुकीच्या (Investment) विविध पर्यायांना प्राधान्य दिले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात भारताने खूप प्रगती केली असून भारतीयांचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांनी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांना प्राधान्य दिले आहे. 1992 मध्ये सेबीच्या (SEBI – Securities and Exchange Board of India) स्थापनेमुळे शेअरहोल्डर्सच्या संरक्षणाला चालना मिळाली आणि भारतीय इक्विटी (equity) संस्कृतीच्या वाढीस प्रोत्साहन मिळाले.

कधी काळी गुंतवणूकीचा सर्वात शेवटचा पर्याय म्हणून पाहण्यात येणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या पर्यायाला आता मात्र भारतीय पसंती दर्शवत असल्याचे चित्र आहे. नुकतेच बँक बझार ने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार मुदत ठेवीदारांपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बँक बझारने केलेल्या सर्वेक्षणात जवळपास 57% लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये तर 54% लोकांनी मुदत ठेवींमध्ये बचत केल्याचे सांगितले. तर 20 टक्क्यांहून अधिक लोकांनी बचतीसाठी दोन्ही पर्यायांची निवड केली आहे. मुदत ठेवीत गुंतवणूक करणारे 35 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत. तर 22 ते 34 वयोगटातील गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचा पर्याय निवडला.

गुंतवणूकीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर (Women ahead of men in investment)

बँक बझारने केलेल्या अहवालात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये (Investment through Mutual Fund SIP) गुंतवणूक करण्यात महिला पसंती दर्शवत असल्याचे म्हटले आहे. 60% महिला या एसआयपीद्वारे गुंतवणूक करत आहेत तर सरासरी 55% पुरुष एसआयपीद्वारे गुंतवणूक करत आहेत. 3 वर्षांपूर्वी सरासरी 40% पेक्षा कमी महिला एसआयपीद्वारे गुंतवणूक करत होत्या. शेअरमार्केटमधील गुंतवणूकीत मात्र पुरुष आघाडीवर आहेत. सरासरी 48% पुरुषांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूकीला प्राधान्य दिले. तर सरासरी 41% महिलांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूकीला पसंती दर्शवली आहे.

तरुणांची पसंती शेअर मार्केटला (Young people prefer stock market)

57% लोक म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये, 54% विमा/युलिप मध्ये, 46% शेअर बाजारात (Share market), 45% सोने-चांदीत, 33% भविष्य निर्वाह निधी/पीपीएफ, 31 टक्के शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. तर 1 टक्के जनता कुठेही गुंतवणूक करत नसल्याचे समोर आले आहे. बहुतांश भारतीय तरुणांचा ओघ हा शेअर बाजारातील थेट गुंतवणूकीकडे आहे. शेअर मार्कटमध्ये थेट गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल माहिती घेण्याची शिफारस या विषयातील तज्ज्ञ तरुणांना करतात. तर शेअर मार्केटमधील गुंतवणूकीशिवाय एनपीएस, बाँड, ठेव प्रमाणपत्र, रिअल इस्टेट इ. पर्यायांमध्ये तरुण आणि पगारदार मंडळी गुंतवणूक करत आहेत.