Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payments in Nepal: भारतीयांना नेपाळमध्ये करता येणार UPI व्यवहार, लवकरच सुरू होणार सेवा!

UPI Payments

भारतीय ई-वॉलेटचा वापर करण्याची सोय नेपाळमध्ये सुरू झाल्यास सामान्य पर्यटकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दूरच्या प्रवासात पैसे घेऊन जाणे लोक शक्यतो टाळतात. अशावेळी जर Digital Payment ची सुविधा उपलब्ध असेल तर नागरिकांना हे सोयीस्कर ठरणार आहे.

नेपाळ हा भारताचा शेजारी देश. भारताचा मित्र देश म्हणून नेपाळला ओळखलं जातं. अनेक नेपाळी नागरिक रोजगारासाठी भारतात येतात तर भारतीय नागरिक देखील तेथे नोकरी धंद्यासाठी जात असतात. विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक लोक नेपाळमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. पर्यटनासाठी देखील अनेक भारतीय नेपाळला जात असतात. जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो लोक नेपाळला जात असतात. सर्वसामान्य समज असा आहे की नेपाळमध्ये भारतीय चलन बदलण्याची गरज नाही. काही प्रमाणात हे खरे देखील आहे. भारतीय रुपयांत आपल्याला नेपाळमध्ये व्यवहार करता येतात. 1 नेपाळी रुपयाची किंमत भारतीय चलनात 0.60 पैसे इतकी आहे. भारतीय चलनापेक्षा नेपाळी चलन स्वस्त असल्याने नेपाळी व्यापारी भारतीय चलनी नोटा स्वीकारतात. येथील व्यापारी या नोटा नेपाळच्या सरकारी बँकेत भरून बाजारभावाने भारतीय चलनी नोटांच्या बदल्यात नेपाळी पैसे मिळवतात. अर्थात त्यांना या प्रक्रियेतून फायदाच होतो.

आता या आर्थिक व्यवहारात एक नवा बदल लवकरच होणार आहे. नेपाळ आणि भारत हे दोन देश ई-वॉलेट (E Vallet) वापरून सीमापार डिजिटल पेमेंटसाठी (Digital Payment) करारावर स्वाक्षरी करणार आहेत, ज्यामुळे व्यवहार करताना येणारे अडथळे दूर होऊन व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. चलनी नोटा देऊन व्यवहार करण्याची सोय नेपाळमध्ये असली तरी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याची कुठलीही सुविधा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. भारतातील UPI Payment ची सुविधा केवळ भारतीय बँकांमध्ये होणाऱ्या व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात ही सुविधा नेपाळमध्ये देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नेपाळी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (Nepal Prime Minister Pushpa Kamal Dahal) हे भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान UPI Payment संबंधी करारावर स्वाक्षरी होऊ शकते असे  सूत्रांचे म्हणणे आहे. या करारामुळे नेपाळला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना BharatPe, PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या भारतीय ई-वॉलेटचा वापर करून डिजिटल पेमेंट करता येणार आहे.

पर्यटनाला मिळेल चालना

भारतीय ई-वॉलेटचा वापर करण्याची सोय नेपाळमध्ये सुरू झाल्यास सामान्य पर्यटकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दूरच्या प्रवासात पैसे घेऊन जाणे लोक शक्यतो टाळतात. अशावेळी जर Digital Payment ची सुविधा उपलब्ध असेल तर नागरिकांना हे सोयीस्कर ठरणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांचा मुक्काम सरासरी 5.8 दिवसांचा आहे. या कालावधीत प्रति व्यक्ती 11,310 रुपये खर्च येतो. या 11,310 भारतीय रुपयांची किंमत नेपाळी चलनात सुमारे 18,000 इतकी आहे. त्यामुळे नेपाळी व्यापाऱ्यांना कमाईत फायदा होईल तर भारतीय पर्यटकांचा चलन बदली करण्याचा अथवा कॅश स्वरूपात पैसे जपून ठेवण्याचा त्रास वाचेल.

मनाम इन्फोटेकशी हातमिळवणी

नेपाळमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) आंतरराष्ट्रीय शाखेने, इंटरनॅशनल पेमेंट्सने गेटवे पेमेंट सर्व्हिसने (international Payments Gateway Payment Service) मनम इन्फोटेक (Manam Infotech Private Limited) कंपनीशी हातमिळवणी केली आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट करणे सोपे व्हावे यासाठी प्रणाली विकसित केली जाणार आहे.

मागील वर्षांपासून नेपाळमधील डिजिटल पेमेंट्स संदर्भात चर्चा होत आहे, परंतु नेपाळच्या प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.