Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Startup नी उभारला 24 अब्ज डॉलरची निधी, मात्र 33 टक्क्यांची घसरण

Indian Startup

Image Source : www.india.postsen.com

Indian Startup : भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न) गेल्या वर्षात 24 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात घसरण झालेली बघायला मिळत आहे.

भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न)  2022 मध्ये  अब्ज डॉलरचा (सुमारे 1.95 लाख कोटी रुपये) निधी गुंतवणूकदारांकडून उभा केला आहे. मात्र त्याआधीच्या वर्षाशी याची तुलना केली तर त्यात घसरण झालेली आहे. त्यात 33 टक्क्यांची घसरण झालेली दिसून येत आहे. त्याआधीच्या म्हणजे  2019 आणि 2020 च्या तुलनेत गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये  वर्षात दुप्पट निधी उभारणी झाली आहे, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या ‘पीडब्लूसी’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

‘स्टार्टअप ट्रॅकर-सीवाय 2022’ या रिपोर्टप्रमाणे , जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण असतानाही जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार भारतीय नवउद्यमी परिसंस्थेबाबत सकारात्मक होते. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 24 अब्ज डॉलरची निधी उभारणी झाली आहे.  हा निधी  2021 च्या तुलनेत 33 टक्के इतका कमी आहे. 2021 या वर्षात 35.2 अब्ज म्हणजेच 2.85 लाख कोटी रुपयांचा निधी उभारला होता. तर 2019 मध्ये 13.2अब्ज डॉलर आणि 2020 मध्ये 10.9 अब्ज डॉलरचा निधी उभारला गेला होता. 
Indian Startup मध्ये  सॉफ्टवेअर सेवा या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.  मात्र जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरणामुळे नवउद्यमी खर्चाला आवर घालत असून विस्तार योजना पुढे ढकलत आहेत, असे ‘पीडब्लूसी’चे भागीदार अमित नावका यांनी म्हटले आहे. डिसेंबर 2022 पर्यंत बेंगळूरु, एनसीआर आणि मुंबईमधील नवउद्यमींनी एकूण निधीच्या 82 टक्के इतकी निधी उभारणी केली. बेंगळूरुमध्ये सर्वात जास्त नवउद्यमी आहेत, तसेच त्यानंतर एनसीआर आणि मुंबईचा क्रमांक लागतो. भारतात नवउद्यमींसाठी अनुकूल वातावरण असून सध्या देशात ६० हजारहून अधिक नवउद्यमी कार्यरत आहेत. जागतिक स्तरावरील 13 पैकी एक नवउद्यमी भारतात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

कंपनीने एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठल्यानंतर तिला युनिकॉर्न असे म्हटले जाते.  भारतातील चार नवउद्यमी या डेकाकॉर्न म्हणजेच ज्यांनी दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली अशा आहेत, अशी नोंद आहे.  त्यामध्ये फ्लिपकार्ट, पेटीएम, बायजू आणि ओयो रूम्स यांचा समावेश असल्याचे दिसून येते.