माल वाहतुकीबरोबरच रेल्वेने प्रवाशांच्या कमाईतही (Indian Railway) वाढ केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत अनारक्षित तिकिटांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत प्रवाशांच्या कमाईत एकूण 73 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये आरक्षित तिकिटांमध्ये 48 टक्के आणि अनारक्षित तिकिटांमध्ये 361 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत प्रवाशांकडून रेल्वेची एकूण कमाई 54733 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 31634 कोटींची कमाई झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या कमाईत 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 6590 लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर गेल्या वर्षी या कालावधीत 6181 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. अशाप्रकारे प्रवाशांच्या संख्येत सात टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
या कालावधीत आरक्षित प्रवाशांकडून 42,945 कोटी रुपयांची कमाई झाली आहे, तर गेल्या वर्षी या कालावधीत 29,097 रुपयांची कमाई झाली होती. अशाप्रकारे 48 टक्के अधिक उत्पन्नाची नोंद झाली आहे.
या कालावधीत 45180 अनारक्षित प्रवाशांची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी 19785 प्रवाशांची नोंदणी झाली होती. अशाप्रकारे प्रवाशांच्या संख्येत 128 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. या कालावधीत अनारक्षित तिकिटांची कमाई 11788 कोटी रुपये झाली आहे, तर गेल्या वर्षी ही कमाई 2555 कोटी रुपये होती. अशा प्रकारे, अनारक्षित प्रवाशांच्या कमाईत 361 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
बजेटमध्ये काय मिळाले?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या अर्थसहाय्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली गेलेली आर्थिक तरतूद 2013-14 मधील रेल्वेच्या अर्थसंकल्पापेक्षा जवळपास 9 पट अधिक आहे.