कमॉडिटी बाजारात आज मौल्यवान धातूच्या किंमती आजही कमी झाल्याचे पहायला मिळाले. गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,500 असून चांदी 60.600 रुपयांनी विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती बदलताना दिसतात. सोमवारी आठवडा सुरु होताच सोनं-चांदीच्या किंमतीत घट दिसली. आजही सोनं-चांदीच्या किंमती कमी झाल्याचे पहायला मिळाले.
आजचे सोनं-चांदीचे दर (Todays Gold and Silver Rate)
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 48,500 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत प्रति 10 ग्रॅम 52,920 आहे. पुणे, नागपूर आणि नाशिकमध्येही मुंबईतील दराप्रमाणेच सोन्याच्या किंमती आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 606 रुपये इतका होता.
अशी तपासा सोन्याची शुद्धता (How to check gold’s purity?)
‘BIS Care App’ चा वापर करुन तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. याशिवाय तुम्ही याबाबत तक्रारसुद्धा नोंदवू शकता. वस्तूचा परवाना, नोंदणी, हॉलमार्क चुकीचा आढळल्यास याबाबतची तक्रार ग्राहक तात्काळ करू शकतात.
- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
- 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
- 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.
- 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.
- 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.
सोन्याचे आर्थिक महत्त्व (Gold’s economic importance)
भारतीयांना सर्वात जास्त कोणता धातू प्रिय असेल तर तो सोनं आहे. लग्नसमारंभ, सण आदि दिवशी भारतात सोन्याचे दागिने घालण्याची पद्धत पूर्वीपासून सुरु आहे. त्यामुळे दिवाळी, अक्षय्य तृतीया आणि इतर सणांदिवशी त्याचप्रमाणे लग्नसमारंभांच्या मोसमात सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. सरकारचा सोन्याचा साठा, महागाई, जागतिक ट्रेंड, व्याजदर या घटकांवर सोन्याची किंमत ठरते. सोन्याच्या किंमतीवरून कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुदृढ आहे किंवा नाही हे ठरते. म्हणजेच ज्या देशात सोन्याची किंमत अधिक असते त्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असते. तर ज्या देशात ही किंमत कमी असते त्या देशाची अर्थव्यवस्था बळकट असते.
हेत.