Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Become Developed Nation: तंत्रज्ञानाचा वापर करून 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार- प्रधानमंत्री मोदी

Narendra Modi

व्यवसायांसाठी टिकवण्यासाठीचा खर्च कमी व्हावा आणि विनात्रास लोकांना परवानगी मिळावी यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. लहान स्वरूपाचे उद्योग चालू ठेवण्यासाठी त्याला कोणकोणत्या अडचणी येतात याचा सध्या अभ्यास सुरु असून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय काढला जाणार असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.तंत्रज्ञानाचा वापर करून भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल असेही ते म्हणाले.

Developed Nation: तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल असा विश्वास भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करत आहे आणि डिजिटल क्रांतीचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचतील याची खात्री करत आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मालिकेत मोदी 'हार्नेसिंग पोटेंशियल: इज ऑफ लाइफ युजिंग टेक्नॉलॉजी' (Harnessing Potential: Ease of Life Using Technology) या विषयावर म्हणाले की सरकार लहान व्यवसायांसाठी परवानगी मिळवण्याचा खर्च कमी व्हावा आणि पद्धतशीर, विनात्रास लोकांना परवानगी मिळावी यासाठी  कसोशीने प्रयत्न करत आहे. लहान स्वरूपाचे उद्योग चालू ठेवण्यासाठी त्याला कोणकोणत्या अडचणी येतात याचा सध्या अभ्यास सुरु असून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय काढला जाणार असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.

तक्रार आणि समाधान यांच्यात फक्त तंत्रज्ञान 

पंतप्रधान म्हणाले, 'आम्हाला छोट्या व्यवसायांचा उत्पादन खर्च किंमत कमी करायचा आहे. आपण अनावश्यक अनुपालनांची यादी तयार करू शकता जी दूर केली जाऊ शकते’ आम्ही 40,000 अनुपालन काढून टाकले आहेत, असेही ते म्हणाले. करदात्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी करप्रणाली 'फेसलेस' केली जात आहे. ते म्हणाले, 'आता तुमच्या तक्रारी आणि त्यांचे निराकरण यात कुठलाही व्यक्ती नाही, फक्त तंत्रज्ञान आहे., असे म्हणत त्यांनी येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेवर सरकार देखील जोर देणार आहे हे स्पष्ट केले.

तंत्रज्ञानामुळेच 'वन नेशन, वन रेशन' (One Nation, One Ration) योजना प्रत्यक्षात येऊ शकली, असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘जेएएम’ या त्रयीने (जन-धन योजना, आधार आणि मोबाईल नंबर) गरिबांपर्यंत लाभ पोहोचवण्यात मदत केली आहे. पंतप्रधान म्हणाले की 5G आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या तंत्रज्ञानावर चर्चा केली जात आहे आणि ते औषध, शिक्षण, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयार आहेत. त्यांनी भागधारकांना सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या अशा 10 समस्या ओळखण्यास सांगितले आहे, ज्या AI चा वापर करून सोडवता येतील.

ते म्हणाले की, 21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित असून ते केवळ डिजिटल, इंटरनेट तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहू शकत नाही. मोदी म्हणाले, 'गेल्या काही वर्षांच्या प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांचे जीवन सुसह्य करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्शाला प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारचा हस्तक्षेप आता कमी झाला असून नागरिक सरकारला अडथळा मानत नाहीत, असेही ते म्हणाले.