Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPPB Bank Alert: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा खातेधारकांना इशारा

India Post Payments Bank

IPPB Bank Alert: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की, सायबर गुन्हे करणारे लोक आयपीपीबीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील शेअर करू नका. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहाल.

इंटरनेटचा वापर जितका वाढत आहे तेवढ्याच प्रमाणात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. IPPBOnline च्या नावाने बनावट कॉल करुन ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास केले  जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (India Post Payments Bank) ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • पोस्ट ऑफिसच्या नावावर कॉल जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या उद्देश्याने ग्राहकांकडून खाते तपशील घेतला जातो.
  • नोकरीच्या बदल्यात पैशांची मागणी केली जाते.
  • वेगवेगळ्या माहिती आणि योजनांची लाच दाखवून लोकांची खाती रिकामी केली जातात.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की, सायबर गुन्हे करणारे लोक आयपीपीबीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील शेअर करू नका. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहाल.

IPPB दिलेल्या टिप्स:

  1. जर तुम्हाला कोणी IPPB च्या नावाने कॉल केला असेल तर विचार न करता तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
  2. कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, कंपनी आणि व्यक्तीची सत्यता पडताळून पहा.
  3. नोकरीच्या कोणत्याही आश्वासनाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी ज्या कंपनीच्या नावाने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागवली जात आहे, त्या कंपनीची माहिती घ्या.
  4. तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.
  5. या टिप्सच्या आधारे तुम्ही तुमचे खाते सुरक्षित ठेऊ शकता आणि सायबर गुन्ह्याला रोखू शकता.