Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Care Sale: कार खरेदी जोमात! जूनमध्ये मारुती सुझुकीच्या 1 लाख 59 हजार गाड्यांची विक्री

Car Sale

भारतीयांची कार खरेदी जोमात असल्याचं जून महिन्यातील आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मारुती सुझुकीने एका महिन्यात 1 लाख 59 हजार गाड्यांची विक्री केली. मागील वर्षभरापासून कार लोनचे दर वाढलेले असले तरी खरेदीचा जोर कमी झाला नाही. जून महिन्यात मारुती सुझुकीने सर्वाधिक गाड्यांची विक्री करत बाजी मारली.

Car sale: भारतीयांची कार खरेदी जोमात असल्याचं जून महिन्यातील आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मारुती सुझुकीने एका महिन्यात 1 लाख 59 हजार गाड्यांची विक्री केली. मागील वर्षभरापासून कार लोनचे दर वाढलेले असले तरी खरेदीचा जोर कमी झाला नाही. जून महिन्यात मारुती सुझुकीने सर्वाधिक गाड्यांची विक्री करत बाजी मारली. मागील वर्षी जून महिन्यात कंपनीने 1,55,857 गाड्यांची विक्री होती. त्यात वाढ झाली आहे.

कोणत्या गाड्यांची सर्वाधिक विक्री 

ब्रेझा, ग्रँड वितारा, एर्टिगा या गाड्यांची विक्री दुपटीपेक्षा जास्त वाढली. मागील वर्षी जून महिन्यात फक्त 18 हजार गाड्यांची विक्री झाली होती. तर या वर्षी या तीन मॉडेल्सची विक्री 43,404 झाली. दरम्यान, कंपनीची निर्यात रोडावली आहे. जुलै महिन्यात कंपनी Invicto ही गाडी लाँच करणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री आणखी वाढू शकते. या गाडीची बुकिंगही सुरू झाली आहे.

टोयोटा किर्लोस्कर गाड्यांची विक्री 19 % वाढली

टोयोटा किर्लोस्कर गाड्यांची विक्री जून महिन्यात 19% वाढली. वर्षभरापूर्वी फक्त 16,512 गाड्यांची विक्री झाली होती. त्यात वाढ होऊन यावर्षी जून महिन्यात 19,608 गाड्यांची विक्री झाली. अर्बन क्रूझर हायरायडर, इनोव्हा हायक्रॉस, ग्लान्झा, फॉर्च्युनर, कॅम्ब्री या गाड्यांची विक्री वाढली आहे.

ह्युंदाईच्या 65 हजार गाड्यांची विक्री

जून महिन्यात ह्युंदाई कंपनीने 65,601 गाड्यांची विक्री केली. मागील वर्षी जूनच्या तुलनेत ही वाढ 5% आहे. देशांतर्गत बाजारपेठेत 50 हजार गाड्या कंपनीने विकल्या. तर 15,600 गाड्या निर्यात केल्या. वेरना, क्रेटा, ट्युकसन या गाड्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे कंपनीने म्हटले.

एमजी मोटर्सच्या गाड्यांनाही भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. जून महिन्यात गाड्यांची किरकोळ विक्री 14% वाढून 5125 झाली आहे. बिपरजॉय वादळामुळे चारचाकी गाड्यांच्या निर्यातीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हा अडथळा दूर झाला असून मान्सून आणि पुढील सणांच्या काळात वाहन विक्री वाढेल, अशी अपेक्षा ऑटो कंपन्यांना आहे.