• 05 Feb, 2023 14:18

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Davos Summit 2023: 'भारत जगाची अर्थव्यवस्था लीड करू शकतो', असं TATA समूहाचे चीफ एन. चंद्रशेखरन का म्हणाले?

Davos Summit 2023

Image Source : www.thelocalreport.in

Davos Summit 2023: 'इंडिया ऑन द पाथ टू $10 ट्रिलियन इकॉनॉमी' या विशेष सत्राला TATA समूहाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन(N. Chandrasekaran) यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताच्या प्रगती तक्त्याला अधोरेखित करताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

Davos Summit 2023: स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये भरलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम(WEF 2023)' या परिषदेचा आजचा शेवटचा दिवस आहे. 15 ते 19 जानेवारी 2023 या पाच दिवसाच्या परिषदेत देशासाठी आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी अनेक गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. याच परिषदेत बुधवारी(18 जानेवारी 2023) टाटा(TATA) समूहाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन(N. Chandrasekaran) यांनी भारत जगाची अर्थव्यवस्था लीड करू शकतो असं म्हटलं.  त्यांनी नेमकं कोणत्या प्रसंगी आणि का असं म्हणालं चला जाणून घेऊयात.

कोणत्या प्रसंगी एन.चंद्रशेखरन(N. Chandrasekaran) असं म्हणाले?

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या(WEF 2023) चौथ्या दिवशी(18 जानेवारी) 'इंडिया ऑन द पाथ टू $10 ट्रिलियन इकॉनॉमी'(India on the Path to $10 Trillion Economy) या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला संबोधित करण्याचा मान टाटा(TATA) समुहाचे प्रमुख एन.चंद्रशेखरन(N. Chandrasekaran) यांना देण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, भारताने तंत्रज्ञानाचा फायदा करून घेत प्रगती करायला सुरुवात केली आहे. अलिकडच्या काही वर्षांत भारताच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे आणि तो आता जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या मार्गाने नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. 75 वर्षांच्या या कार्यकाळात ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोठी क्षमता भारताने तयार केली आहे.

संबोधित करताना कोणत्या मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले?

टाटा(TATA) समूहाचे प्रमुख एन.चंद्रशेखरन(N. Chandrasekaran) संबोधित करताना म्हणाले की, जगातील सर्वात जास्त पदवीधर(Graduated) भारतात आहेत. देशाला अधिक भक्कम व उज्ज्वल बनवण्यासाठी शिक्षण(Education) हे अतिशय गरजेचे असते, वेगवेगळ्या घटकांपैकी हा एक महत्त्वाचा घटक भारताकडे आहे. याशिवाय कोविड सारख्या महामारीच्या काळात भारताने स्वतःची लस(Vaccine) तयार करून या महामारीवर नियंत्रण मिळवले. डिजिटलायझेशनच्या(Digitalisation) क्षेत्रातही भारताने उलेखनीय कामगिरी केली आहे. माझ्यासाठी वृद्धी, वृद्धी आणि वृद्धी या तीनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सध्या जगाला सामर्थ्याची गरज असून भारत यामध्ये आघाडीवर आहे, विशेषत: पुरवठा साखळी फ्रेमवर्कमध्ये भारताची कामगिरी अनन्यसाधारण आहे. पर्यटनाच्या(Tourism) बाबतीत माहिती देताना आम्हाला सांगायला आवडेल की, सध्या देशात एक कोटी पर्यटक येतात, मात्र 10 कोटी पर्यटकांना आमंत्रित करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी विमानतळ, रस्ते, रेल्वे आणि जहाजबांधणी या सारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत काम करत आहे. हे करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असून लवकरच आम्ही निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहचू.