आपण 15 ऑगस्टला आपला 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. ही तर आपल्यासाठी मोठी गोष्ट आहेच. पण त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी आणि इलेक्टॉनिक वस्तुंची विक्री करणाऱ्या ब्रॅण्ड्सनी भरमसाठ ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर्समधून तुम्ही तुमच्या आवडीच्या, गरजेच्या आणि महाग वाटणाऱ्या वस्तू कमी किमतीत विकत घेऊ शकता. त्यामुळे हा स्वातंत्र्य दिन तुमच्यासाठी नक्कीच आर्थिक फायद्याचा ठरू शकतो.
आपण अशा काही ई-कॉमर्स कंपन्या आणि ब्रॅण्डने आयोजित केलेल्या Independence Offers बद्दल जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
ॲमेझॉन (Amazon)
ॲमेझॉनने भारताच्या 76 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त 4 ते 8 ऑगस्ट असा 5 दिवसांचा ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 (Amazon Great Freedom Festival Sale 2023) आयोजित केला आहे. या सेलद्वारे ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, ऑडिओ ॲसेसिरीज, स्मार्टवॉचेस, स्मार्ट टिव्ही, अलेक्सा, फायर टीव्ही, घराच्या सुशोभिकरणासाठी लागणारे साहित्य आणि त्याचबरोबर भरमसाठ इलेक्टॉनिक गॅझेट कमी किमतीत म्हणजे जवळपास 60 ते 70 टक्क्यांपर्यंत यावर सवलत मिळणार आहे.
Flipkart (फ्लिपकार्ट)
फ्लिपकार्टने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून बुधवारपर्यंत (4 ते 9 ऑगस्ट, 2023) या कालावधीत बिग सेव्हिंग डे (Flipkart Big Saving Days) आयोजित केला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. हा सेल 4 ऑगस्टच्या 12 वाजल्याापासून सुरू होणार आहे. तर फिल्पकार्ट प्लस मेंबर्स ग्राहकांना गुरूवारपासून (दि. 3 ऑगस्ट) खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्रोसरी, मोबाईल आणि इतर कॅटेगरीतील वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 ते 5 हजारांच्या खरेदीवर किमान 250 रुपयांपासून 1750 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
Myntra (मिन्त्रा)
मिन्त्राचा Independence Day Sale 3 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. तो 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमधून ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. फूटवेअर आणि फॅशन सेलवर 40 ते 60 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. तर इअरफोन, हेडफोन आणि इअरपॉड्सवर जास्तीत जास्त 80 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.
Reliance Digital (रिलायन्स डिजिटल)
रिलायन्स डिजिटलचा सेल 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि तो 15 ऑगस्ट सुरू राहणार आहे. या सेल दरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर भरमसाठ डिस्काउंट ऑफर दिली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डचे स्मार्टफोन, स्मार्टवॉच यावर भरमसाठ डिस्काउंट दिला जाणार आहे.
क्रोमा (Croma)
क्रोमाचा Independence Day Sale 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान सुरू असणार आहे. देणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या स्मार्टवॉच, लॅपटॉप, स्मार्ट टिव्ही, यावर जवळपास 80 टक्क्यांपर्यंत भरमसाठ डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना फ्री गिफ्ट्स देखील मिळणार आहेत.
सॅमसंग (Samsung)
सॅमसंगचा Independence Day Sale 2023 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. या सेल ऑफरमध्ये ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. तर जवळपास 4 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरमधून ग्राहकांना Samsung Galaxy Z Fold 5, Samsung Galaxy Y Flip 5, Samsung Galaxy Watch 6 चांगली ऑफर मिळू शकते.