मिन्त्रा या ई-कॉर्मसवेबसाईटवर फॅशनेबल आणि डिझायनर कपडे कमीत कमी किमतीत मिळावे. यासाठी मुशाफिरी करणारे बरेच आहेत. अशाच चोखंदळ ग्राहकांसाठी मिन्त्राने स्वातंत्र्य दिनानिमित्त सेल जाहीर केला आहे. हा सेल गुरूवारपासून (दि. 3 ऑगस्ट, 2023) सुरू झाला असून तो 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Myntra Independence Day Sale 2023 मध्ये फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, मोबाईल अॅक्सेसरीज, स्मार्टवॉच, कपडे यावर 40 टक्क्यांपासून 60 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. मिन्त्राने आपल्या ई-कॉमर्स साईटवर पुरुष, महिला, मुले आणि मुली अशा चार प्रकारच्या मेजर कॅटेगरी दिल्या असून, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या 546 प्रोडक्टनुसार सब कॅटेगरी आहेत. तसेच या कॅटेगरींसाठी जवळपास 6500 हून अधिक ब्रॅण्ड उपलब्ध करून दिले आहेत. यातील काही प्रोडक्टवर 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.
इअरपॉड्सवर भारी डिस्काउंट्स
मिन्त्रावर OnePlus, boAt, NOISE, Portronics आणि Nothing यासारख्या ब्रॅण्ड्सच्या इअरफोन, इअरपॉड्सवर भारी डिस्काउंट दिला जात आहे. Nothing ब्रॅण्डचे 13 हजारांचे वायरलेस इअरफोन 10 हजारांना मिळणार आहेत. OnePlus कंपनीचे 2300 रुपयांचे इअरबड्स 2100 रुपयांत उपलब्ध आहेत. Portronics कंपनीचे 2000 रुपयांचे इअरपॉड्स अवघ्या 700 रुपयांत उपलब्ध आहेत. तसेच NOISE कंपनीचे 3000 रुपयांचे वायरलेस इअरबड्स मिन्त्रावर 800 रुपयांत उपलब्ध आहेत.
फॅशनेबल कपडे आणि फूटवेअर
Allen Solly, Biba या नामांकित ब्रॅण्डसोबतच सिंगनी, कालिनी, केट्च, लिबास्, सांग्रिया, अनन्या या ब्रॅण्डवर मिन्त्रा 40 टक्क्यांपासून डिस्काउंट देत आहे. कपड्यांमध्ये एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर कपड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर H&M, Nike, U.S. Polo Assn., Atom, HRX, Roadster, Puma, Red Tape या फूटवेअर ब्रॅण्डवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.