Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Freedom Sale 2023: ॲमेझॉनचा फ्रीडम सेल सुरु; जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट

Amazon Great Freedom Sale 2023

Image Source : www.amazon.in

Amazon Independence Freedom Sale 2023: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित केलेला ॲमेझॉन फ्रीडम सेल 2023 आजपासून (दि. 4 ऑगस्ट) सर्वांसाठी सुरू झाला आहे. त्यामुळे तुमच्या स्वस्तातील खरेदीच्या मोहिमेला तुम्ही सुरुवात करू शकता.

बरेच जण आपल्या आवडीच्या आणि महत्त्वाच्या वस्तुंच्या खरेदीसाठी डिस्काउंट सेलची वाट पाहत असतात. कारण अशा मोठ्या सेलमध्ये अनेक वस्तुंवर भरपूर डिस्काउंट दिला जातो. यात प्रामुख्याने स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, गॅझेट, ट्रेण्डिंग आयटम्स आणि इतकंच नाहीतर घरासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तुंवरही भरघोस सवलत मिळते. ज्यांनी ॲमेझॉनची प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यांच्यासाठी हा सेल कालपासून सुरू झाला आहे. तर नियमित ग्राहकांसाठी तो आजपासून ओपन झाला आहे आणि हा सेल 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू असणार आहे.

लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉचवर भरघोस डिस्काउंट

Amazon Laptop Offers

ॲमेझॉनने यावेळी ग्रेट फ्रीडम सेल 2023 मधून ग्राहकांसाठी लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच आणि मोबाईलच्या वेगवेगळ्या ॲक्सेसिरीजवर भरपूर डिस्काउंट दिला आहे. या डिस्काउंट प्रोडक्टमध्ये नामांकित कंपन्यांचे ब्रॅण्ड आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात मस्त वस्तू मिळण्याची ही एक मोठी संधी आहे. यामध्ये डेल, एचपी, ॲपल, फिटबिट, सॅमसंग यासारख्या कंपन्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा जुना लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टवॉच बदलायचे असतील, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

फॅशनेबल आणि डिझायनर कपड्यांवर 60 टक्के डिस्काउंट

तुम्हाला जर तुमचा लूक आणि पेहराव बदलायचा असेल, तर ॲमेझॉन तुमच्यासाठी खूप सारे पर्याय घेऊन आले आहे. Amazon Great Freedom Sale 2023 मधून तुमच्या पसंतीच्या कपड्यांची खरेदी करू शकता. ते ही 60 टक्क्यांच्या डिस्काउंट ऑफर्ससह. यामध्ये ब्रॅण्डेड शर्ट, टी-शर्टसह, जीन्स, वॉलेट अशी भरपूर खरेदी करू शकता. तर महिलांसाठी डिझायनर साड्या, ड्रेस मटेरिअल, तसेच स्पोर्ट्स खेळणाऱ्या दोस्तांसाठी ट्रॅक सूटपासून सर्व प्रकारच्या खेळांच्या जर्सी कमी किमतीत मिळणार आहेत.

घर सजावटीचे आणि किचनमधील महत्त्वाची उपकरणे

घरातील फ्रीज, गिझर, ओव्हन  किंवा घराचे पडदे, शोभेच्या वस्तू या सगळ्या बदलायची एक चांगली संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. यामध्ये फक्त तुम्हाला फक्त तुमच्या गरजेच्या वस्तू मिळणार नाहीत. तर त्या ब्रॅण्डेड कंपनीच्या असून त्यावर भरपूर डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे.

स्मार्टफोन्स बदलण्याची योग्य संधी

Amazon Smartphone Offers

ॲमेझॉनच्या फ्रीडम सेलची मोबाईल प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या सेलमध्ये अनेक चांगल्या बॅण्डचे मोबाईल ग्राहकांना स्वस्तात मिळतात. स्मार्टफोनमधील टॉपचे ब्रॅण्ड ॲपल, सॅमसंग, शिओमी, वन प्लस, ओप्पो, रिअलमी अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या मोबईलवर भरपूर डिस्काउंट मिळतो. त्यामुळे ज्यांना आपला मोबाईल बदलायचा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये प्रीमिअम ब्रॅण्डपासून बजेट कंपन्यांचे फोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑप्शनचा खजिनाच तुमच्यासाठी इथे ओपन असणार आहे.

ॲलेक्सा, किंडल, फायर टीव्हीवरही मोठा डिस्काउंट

Amazon Alexa Fire Tv etc

मुलांसाठी, पालकांसाठी किंवा एकूण कुटुंबासाठी ॲलेक्सा, किंडल, फायर टीव्ही घेण्याचा तुम्ही कित्येक दिवसांपासून विचार करत असाल, तर तो विचार आता सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण इतके दिवस तुम्ही याच्या महागड्या किमतीमुळे थांबला होता. पण आता त्याच ब्रॅण्डच्या वस्तू तुम्हाला 40 ते 50 टक्क्यांच्या सवलतीने मिळणार आहेत.