हिंदी सिनेमांमध्ये जेव्हापासून 'केदारनाथ' मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर दिसू लागला आहे, तेव्हापासून केदारनाथला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असल्याचे केदारनाथ येथील दुकानदार आणि व्यावसायिक सांगतात.
सिनेमानंतर युट्युबर, रील स्टार्सच्या देखील आवडीचे ठिकाण म्हणूनही केदारनाथ हे तिर्थस्थळ जगभरात पोहोचले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ भाविक म्हणून येणारे नागरिक धार्मिक पर्यटन (Religious Tourism) करण्यासाठी देखील केदारनाथला भेट देत आहेत.
मागील आर्थिक वर्षात जवळपास 211 कोटींची केदारनाथमध्ये आर्थिक उलाढाल झाली आहे. मुख्य म्हणजे खेचर, डोली (पालखीमध्ये वयोवृद्ध भाविकांनी घेऊन जाण्याची सोय) आणि पार्किंगच्या माध्यमातून ही कमाई झाली असल्याचे उत्तराखंड सरकारने म्हटले आहे.
श्री केदारनाथ मंदिर। #bharat #uttarakhand #kedarnath #kedarnathtemple #viralreels #trendingreels #explore #harharmahadev #harharshambhu #bholenath #bhole #mahadev #mahakal #hindu #sanatandharam #hindu #bhakti #sanatani #vibe #blessed pic.twitter.com/ZzEiXHfpeh
— Mohit Sharma (@mohitsh7539) September 27, 2023
बद्रीनाथला भाविकांची गर्दी
केदारनाथला येणारे भाविक चार धामपैकी एक मानले जाणारे बद्रीनाथ धाम यात्रेला देखील पसंती देतात. एकाच भेटीत केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा भाविक करतात. या दोन्ही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, खानावळ, पार्किंग, खेचर आणि घोडे यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होत असते.
स्थानिकांना हातभार
यानिमित्ताने धार्मिक पर्यटनासाठी येणारे नागरिक या परिसरातील अर्थव्यवस्था बळकट करत असतात. भाविकांनी किमान 5% रक्कम ही स्थानिक व्यापाऱ्यांकडील वस्तू खरेदीसाठी वापरावी अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या सुचनेचे नागरिक मोठ्या प्रमाणात अनुकरण करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनानंतर एकूणच उत्तराखंड राज्याच्या अर्थव्यस्थेत मोठी उलाढाल होताना दिसते आहे.
सरकारला 8 कोटींचा महसूल
मागील केदारनाथ यात्रेत 15 लाख 36 हजारांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. प्रवासासाठी वापरण्यात येणारी खेचर, घोडे, पालखी यांच्या माध्यमातून स्थानिकांनी 190 कोटी रुपयांची कमाई केली होती. यातून सरकारला 8 कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.
धार्मिक पर्यटनातुन केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील अर्थव्यवस्था विकसित होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना यातून कमाईची संधी देखील मिळते आहे.