गेल्या काही वर्षात भारतात डिजिटल आर्थिक व्यवहार करण्याची चांगली सवय नागरिकांना लागली आहे. मात्र याचा गैरफायदा सायबर चोर घेताना दिसत आहेत. बँकेच्या नावे व्यवहार करून नागरिकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती मागवली जात असून खातेदारांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेण्याची प्रकरणे वाढली आहेत. देशातील महत्वाची बँक मानल्या जाणाऱ्या ICICI बँक खातेदारांना सध्या असा अनुभव येतो आहे. याबाबत बँकेने त्यांच्या खातेदारांना इमेलद्वारे, एसएमएसद्वारे सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
बँकेकडे हजारो तक्रारी
गेल्या काही दिवसांपासून आयसीआयसीआय बँकेचे देशभरातील खातेदार एका नव्या समस्येमुळे हैराण आहेत. बँक कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोर खातेदारांना कॉल करत आहेत. खातेदारांना केवायसी डीटेल्ससाठी, क्रेडीट लिमिट वाढवून घेण्यासाठी किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. यात ग्राहकांचे बँक खाते क्रमांक, मोबाईलवर आलेला ओटीपी आदी माहितीचा समावेश आहे.
Keep your device and privacy secure from malicious threats.
— ICICI Bank (@ICICIBank) October 14, 2023
Choose trusted sources when downloading apps to minimise cyber risks.#BeatTheCheats #SafeBanking pic.twitter.com/4zoFAZSXzx
बँक कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांना लुबाडण्यात सायबर चोर यशस्वी होताना दिसत आहेत. ज्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतले आहेत त्यांनी आता बँकेकडे धाव घेतली आहे. देशभरातून अशी हजारो प्रकरणे बँकेकडे आली असून, याची बँकेने गंभीर दखल घेतली आहे.
बँकेने दिला सतर्कतेचा इशारा
ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना मेलद्वारे आणि मोबाईल संदेशद्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे बँक कर्मचारी ग्राहकांकडून कुठलाही ओटीपी, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड नंबर किंवा इतर माहिती मागत नाहीत, असे बँकेने म्हटले आहे. याशिवाय अशाप्रकारे कुणासोबत आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे होत असल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधावा असेही बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.