Post Office Scheme NSC: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)योजनेमधील व्याजदरात सरकारने वाढ केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच एक परिपत्रक जारी करुन तिमाहीसाठी लघु बचत योजनांची यादी जाहीर केली. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल,मे,जून) छोट्या योजनांवरील व्याजदरात 0.70 टक्क्यांनी वाढ केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत सर्वाधिक वाढ झालेली आहे. एनएससी ही पोस्ट ऑफिस मधील गंतवणूकीच्या बाबतीत सगळ्यात लोकप्रिय योजना आहे.
Table of contents [Show]
एनएससी कर बचत योजना
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) ही एक बचत योजना आहे. ही योजना प्रामुख्याने कमी ते मध्यम उत्पन्न गटाच्या गुंतवणूकदारांसाठी आहे. ही योजना कलम 80C अंतर्गत कर बचत करते. त्यामुळे मध्यमवर्गीय अनेक गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करण्यास पूढे सरसावतात.
एकुण किती टक्के व्याजदर वाढला ?
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व्याजदरात 0.70 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 0.70 टक्क्यांनी करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा व्याजदर एकुण 7.7 टक्के झालेला आहे. एनएससी मधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि हमीभाव देणारी असते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिस मधील सरकारची योजना आहे, त्यामुळे यात कोणतीही रिस्क नाही. या योजनेत तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य नॉमिनी होऊ शकते. तसेच भविष्यात काही अडचण आल्यास कुटुंबातील आणखी दुसरा कोणताही सदस्य नॉमिनी होऊ शकतो.
या योजनेवर मिळते आयकर सुट
NSC योजनेत गुंतवणुकीची कुठलिही कमाल मर्यादा नाही. शिवाय याअंतर्गत आपण अनेक खाती उघडू शकतो. तसेच इन्कम टॅक्स भरतांना कर सूट मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. मुख्य म्हणजे या योजनेत तुम्हाला पाहीजे तेवढी गुंतवणूक करु शकता.
आपातकालीन परिस्थितीत पैसे काढू शकत नाही
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर मिळते. या योजनेत व्यक्तीला चक्रवाढीचा लाभही मिळतो. मात्र, या योजनेत तुम्ही आपातकालीन परिस्थितीत किंवा आंशिक पैसे काढू शकत नाही. गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीच्या वेळी पूर्ण पेमेंट मिळते. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण ही योजना सुरु करु शकतो. बँका कर्जासाठी सुरक्षा हमी पत्र म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे देखील स्वीकारतात.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे काय?
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट ही एक बचत रोखे योजना आहे जी सदस्यांना, प्रामुख्याने लहान ते मध्यम-उत्पन्न गुंतवणूकदारांना, कलम 80C अंतर्गत आयकर बचत करताना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते.
NSC मध्ये कोण गुंतवणूक करु शकतो?
सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राला भारतीय वैयक्तिक नागरिकांसाठी बचत योजना म्हणून प्रोत्साहन दिले आहे. तेव्हा व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF),ट्रस्ट, प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्या NSC मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत. अनिवासी भारतीय (NRIs) NSC मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत. प्रमाणपत्र खरेदी करण्यासाठी कुठलिही वयोमर्यादा दिलेली नाही.