• 31 Mar, 2023 08:40

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Small Cap Fund: मागील पाच वर्षांत 'या' स्मॉल कॅप फंडने दिला आहे भरघोस परतावा

Best Small Cap Fund

Best Small Cap Fund: ज्या कंपन्यांचे बाजारातील भांडवल 2 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते, अशा कंपन्या स्मॉल कॅप श्रेणीत (Small Cap Category) येतात. या कंपन्यांनी गेल्या 5 वर्षात चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.

Best Small Cap Fund: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे (SIP) कमीतकमी पैशांमध्ये इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक प्रामुख्याने शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या वर्गीकरणानुसार केली जाते. ज्याला मार्केट कॅप म्हणजेच कॅपिटलायझेशन म्हणतात. हे कॅपिटलायझेशन प्रामुख्याने लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे 3 प्रकारे मोजले जाते. हे प्रकार कंपन्यांच्या मार्केटमधील भांडवलानुसार पाडले जातात. आज आपण स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्यातून  मिळणाऱ्या परताव्याबद्दल जाणून घेणार आहोत.

स्मॉल कॅपमध्ये कोणत्या कंपन्या येतात?

ज्या कंपन्यांचे बाजारातील भांडवल 2 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कंपन्या स्मॉल कॅप श्रेणीत (Small Cap Category) येतात. या कंपन्यांमध्ये भविष्यात मिड-कॅप (Mid Cap) बनण्याची क्षमता असते. स्मॉल कॅप कंपन्या या उच्च जोखीम आणि उच्च परतावा देणाऱ्या असतात. त्यांची वाढ खूपच वेगवान पद्धतीने होते. पण ते जर व्यवस्थित झाले नाही तर त्यांना मोठे नुकसान ही सहन करावे लागू शकते.

स्मॉल कॅप फंडने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवून दिला आहे. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असतात. त्याचा परिणाम स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडमध्ये दिसून येतो. त्याचा परिणाम नक्कीच चांगल्या परताव्यामध्ये दिसून येतो. काही ठराविक म्युच्युअल फंडने चांगला परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात अशा कोणत्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने चांगला परतावा दिला आहे, हे आपण पाहणार आहोत.

क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)

क्वांट स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट प्लॅनने गेल्या 5 वर्षात 24.27 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनने तेवढ्याच वर्षात 23.04 टक्के परतावा दिला आहे.

अॅक्सिस स्मॉल कॅप फंड Axis Small Cap Fund)

अॅक्सिस स्मॉल कॅपच्या डायरेक्ट स्कीममधून मागील 5 वर्षात 19.06 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 17.37 टक्के परतावा मिळाला होता.

कोटक स्मॉल कॅप फंड (Kotak Small Cap Fund)

कोटक स्मॉल कॅपच्या डायरेक्ट फंडमधून गुंतवणूकदारांना मागील  वर्षात 16.75 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून 15.16 टक्के परतावा दिला आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप (Nippon India Small Cap)

निप्पॉन इंडियाच्या स्मॉल कॅप फंडमधून डायरेक्ट प्लॅनद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षात 15.99 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 14.90 टक्के परतावा दिला आहे.

एसबीआय स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund)

एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडमधून गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षात डायरेक्ट योजनेद्वारे 14.76 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 13.45 टक्के परतावा दिला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल स्मॉल कॅप फंड (ICICI Prudential Small Cap Fund) 

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल स्मॉल कॅप फंडने डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षात 14.17 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून  टक्के परतावा दिला आहे.

एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (HDFC Small Cap Fund)

एचडीएफसी स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट फंडमधून गेल्या  5 वर्षात 13.29 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 12.03 टक्के परतावा मिळाला आहे.

युनिअन स्मॉल कॅप फंड (Union Small Cap Fund)

युनिअस स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट फंडने गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षात 12.64 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 11.77 टक्के परतावा दिला आहे.

आयडीबीआय स्मॉल कॅप फंड (IDBI Small Cap Fund)

आयडीबीआयच्या स्मॉल कॅप फंडमधून गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षात डायरेक्ट फंडमधून 12.24 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 10.76 टक्के परतावा दिला आहे.

एचएसबीसी स्मॉल कॅप फंड (HSBC Small Cap Fund)

एचएसबीसी स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षात 12.50 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 11.30 टक्के परतावा दिला आहे.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)