Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car insurance: कारला आग लागल्यास तुम्हाला 'असा' मिळेल विमा दावा

Car insurance

Image Source : http://www.thomaslawoffices.com/

Car insurance: आजकाल लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करतात. लोक कार आणि बाइक्स घेऊनच प्रवास करतांना जास्त दिसतात. जशी वाहनांची ये जा वाढली त्याप्रमाणे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे वाहनांचा विमा काढणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

Car insurance: आजकाल लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करतात. लोक कार आणि बाइक्स घेऊनच प्रवास करतांना जास्त दिसतात. जशी वाहनांची ये जा वाढली त्याप्रमाणे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे वाहनांचा विमा काढणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्याचप्रमाणे, कार चोरीला गेल्याच्या बातम्या चव्हाट्यावर आल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. यासोबतच अनेकवेळा गाडीला आग लागण्यासारखे अपघातही घडतात. गाडीचा विमा काढला तर अशा प्रसंगी अधिक आर्थिक नुकसान टाळता येते कारण विमा कंपन्यांनी क्लेम पास केल्यास काही रक्कम मिळते.

विमा दावा कसा करावा? (How to make an insurance claim?)

आगीमुळे तुमची कार खराब झाली असेल तर तुम्ही ज्या एजंटकडून पॉलिसी घेतली होती आणि ज्या कंपनीकडून तुम्ही विमा पॉलिसी घेतली होती त्या एजंटला कळवावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करून गाडीला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी लागेल. तुम्ही गाडीला आग लागल्याची छायाचित्रे देखील घ्यावीत जेणेकरुन ती दाव्यादरम्यान दाखवता येईल. एफआयआर नोंदवल्यानंतर, तुम्हाला विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर करावी लागतील. 

या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, एफआयआर (Driving License, RC, FIR) गाडीला लागलेल्या आगीचा फोटो आणि इतर कागदपत्रांचा समावेश असेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या विमा कंपनीला त्यांच्या अधिकाऱ्याला तपासासाठी पाठवायला सांगावे लागेल, जेणेकरून अधिकारी तपासणी प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडू शकेल. तपास अधिकाऱ्याने सखोल चौकशी केल्यानंतरच दावा निकाली काढला जातो. तपासणीनंतर, विमा कंपनीला आग लागण्याचे कारण योग्य असल्याचे आढळल्यास, कंपनी दावा निकाली काढते. यामध्ये कॅशलेस प्रक्रिया, कार दुरुस्ती इत्यादींचा समावेश असू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा (Remember these things)

अपघातानंतर लवकरात लवकर विमा दावा करा. साधारणपणे, दावा अपघातानंतर 24 तासांच्या आत केला पाहिजे. यापेक्षा जास्त उशीर झाला तर तुमचा दावा फेटाळला जाण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही. गाडीला लागलेल्या आगीच्या अपघातासंदर्भात, अशा लोकांच्या संपर्कात राहा, ज्यांच्या डोळ्यांसमोर आगीचा अपघात झाला असेल. विमा दाव्यांमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.