What are The Rules For Flying A Flag: जर भारताची आण,बाण, शान असणारा तिरंगा तुम्ही जर चुकीच्या पध्दतीने लावला, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण तिरंगा लावण्याचे काही नियम आहेत. हे नियम तिरंगा लावताना मोडल्यास तुम्हाला शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. त्यामुळे तिरंगा लावण्याचे नियम काय आहेत, हे जाणून घेवुयात.
Table of contents [Show]
तिंरगा चुकीचा लावल्यास काय होते शिक्षा?
तिंरगा ही राष्ट्राची शान आहे. यासाठी संविधान कलम 19 अंतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण हा तिरंगा तुम्ही चुकीच्या पध्दतीने लावला तर तो गुन्हा ठरविला जातो. त्यामुळे तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. म्हणूनच नियमाला धरून राष्ट्रध्वज फडकविला गेला पाहिजे.
तिरंगा लावण्याचा विशेषाधिकार कोणाला आहे?
संविधानिक प्रमुखाला आपल्या गाडीवर राष्ट्रीय ध्वज लावण्याचा विशेषाधिकार आहे. यामध्ये भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, उपराज्यपाल, पंतप्रधान, अन्य कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्य मंत्री या सर्वांचा समावेश आहे. सोबतच लोकसभा आणि राज्यसभेचे स्पीकर, डिप्टी स्पीकर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान सभा, परिषदेचे स्पीकर, भारताचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विदेशातील भारतीय पदावर असलेले अधिकाऱ्यांदेखील हा विशेषाधिकार आहे.
कोणत्या ठिकाणी तिरंगा लावू शकत नाही?
नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याची परवानगी आहे. मात्र खासगी गाडयांवर ध्वज चुकीच्या पध्दतीने लावल्यास तो गुन्हा मानला जातो. राष्ट्रीय ध्वजाला वाहन, ट्रेन, किंवा नावाच्यावर, साइडला, मागे लावू शकत नाही.
गाडयांवर तिरंगा फडकविण्याचा नियम
गाडीवर तिरंगा नेहमी दांडयानेच फडविला गेला पाहिजे, असे नियमांनुसार सांगण्यात आले आहेत. जसे की, बोनटच्या समोर किंवा मध्यभागी या उजव्या बाजूला तिंरगा हा मजबूत बांधला गेला पाहिजे.
तिरंग्याचा अपमान कसा मानला जातो
तिरंग्याचा कुणी दुरूपयोग, जाळला, फाडला किंवा अवमान केल्यास हा संविधानानुसार गुन्हा मानला जातो. त्या व्यक्तीस तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा दंड या दोन्ही ही शिक्षा होण्याची शक्यता असते.