Electricity Bill: जर तुम्ही वीज बिल ऑनलाइन जमा करत असाल तर ऑनलाइन बिल जमा करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हलगर्जीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) फसवणूक (Fraud) करण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत, जे वीज बिलाशी संबंधित आहेत. अनेक वीज कंपन्या आणि पुरवठादार बिल जारी झाल्यावर एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशाद्वारे ग्राहकांना बिलाची रक्कम आणि भरण्याची तारीख सांगतात. वीजबिलाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार असेच मेसेज पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. ते ग्राहकांना त्याच प्रकारचे संदेश पाठवतात, जे बहुतेक वेळा वीज कंपन्या किंवा पुरवठादारांद्वारे पाठवले जातात.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे आवाहन (Appeal of State Bank of India)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील लोकांना अशा संदेशांपासून (SBI Alert) सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ट्विटरवर अनेकांनी असे मेसेज येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यावर बँकेने ग्राहकांना अशा कोणत्याही मेसेज किंवा कॉलला उत्तर न देण्याबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. या सर्व प्रकारामुळे तुमची आर्थिक माहिती (Financial information)चोरीला जाण्याचा धोका असतो. वीज मंडळ किंवा पुरवठादार सहसा अधिकृत क्रमांकावरून एसएमएस (SMS) पाठवतात, म्हणूनच त्याने नेहमी अधिकृत माहिती चेक करून घ्या.
कशी केली जाते फसवणूक (How is cheating done?)
या प्रकारच्या मेसेजमध्ये तुमचे वीज बिल थकीत आहे. ते अपडेट करण्यासाठी ताबडतोब दिलेल्या नंबरवर कॉल करा. असे न केल्यास तुमचे वीज कनेक्शन खंडित केले जाईल. यासाठी ते तुम्हाला एका नंबरवर कॉल किंवा मेसेज करण्यास सांगतात. असे केल्याने तुमची आर्थिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन फसवणुकीचे (Online fraud) बळी ठरता.
फेक मॅसेजपासून सावधगिरी बाळगा (Beware of fake messages)
जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी (Verified ID) किंवा मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे का ते चेक करा. जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून आला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच या सर्व गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.