कोणत्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीममध्ये (ELSS : ईएलएसएस)गुंतवणूक करावी,याबाबत गुंतवणूकदारामध्ये संभ्रम असतो. गुंतवणूकदार अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत का थांबतात? कधी- कधी गुंतवणूकदार मागील वर्षीच्या गुंतवणुकीने कंटाळून जातात आणि त्यांना काहीतरी नवीन हवे असते. 'ईएलएसएस'मध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात काही कायमस्वरुपी लागू होणारी तत्त्वे समजून आवश्यक आहे.
गरज आधी... निवड नंतर
'ईएलएसएस'मध्ये तुम्हाला तसे करायची गरज असेल तरच गुंतवणूक करा. प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८० क अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी ईएलएसएस हा फक्त एक पर्याय आहे.कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), शाळेची फी, आयुर्विमा प्रीमियम अशा पर्यायांचा वापर करुन 1.50 लाख रुपयांची मर्यादा पूर्ण करु शकतात.ईपीएफ हा स्वयंरोजगारीत लोकांसाठी उपलब्ध नसला तरी इतर सर्व पर्याय उपलब्ध आहेत.'ईपीएफ'च्या जागी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा (पीपीएफ) वापर करु शकतात. या सर्वांसाठी आलेला खर्च मोजा.त्याला 1.50 लाख रुपयांमधून वजा करा आणि त्यानंतर 'ईएलएसएस'ची निवड करायची की नाही हे ठरवा.
तुमच्या मालमत्तांचे वर्गीकरण तपासा
'ईएलएसएस'मधील गुंतवणुकीला तुमच्या समभाग मालमत्ता विभाजनाचा भाग म्हणून समजा.तुम्ही समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आधीच केलेली असल्यास (थेट समभाग किंवा इतर समभाग निधींद्वारे) तर तुम्हाला कर बचत करण्यासाठी 'ईएलएसएस'चा पर्याय निवडण्याची गरज नाही.तुम्ही टॅक्स सेव्हर बँक फिक्स्ड डिपॉझिट,नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट,पब्लिक प्रॉव्हिडंट फंड इत्यादी कर्जाशी संबंधित पर्यायांची निवड करु शकता.तुम्हाला तुमच्या धोरणात्मक समभाग वितरणाचा भाग म्हणून 'ईएलएसएस'चा विचार करायचा असल्यास संपूर्ण वर्षभरात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) गुंतवणूक करणे उत्तम ठरेल.
वैविध्यपूर्णतेमुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईलच असे नाही
समजा तुम्ही 'ईएलएसएस'चा पर्याय घ्यायचा ठरवले असल्यास प्रत्येक वर्षी वेगवेगळा निवडायची गरज नाही.उत्तम फंड मॅनेजर्सकडून दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्डसह चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना उपलब्ध आहेत.इतर बाबी चांगल्या असेपर्यंत तुमच्या विद्यमान गुंतवणुकीत भर घालण्यात काहीही धोका नाही.
बाजाराच्या विद्यमान स्थितीकडे दुर्लक्ष करा
'ईएलएसएस' ही तीन वर्षांसाठी लॉक केलेली असते.या तीन वर्षांच्या कालावधीत बाजारात चढ-उतार होऊ शकतात.त्यामुळे अलिकडेच इंडेक्स कमी झाला (किंवा वाढला)आहे म्हणून 'ईएलएसएस'मध्ये गुंतवणूक करणे किंवा न करणे ही गोष्ट समस्येकडे पाहण्याची उत्तम पद्धत नाही.
तुमच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करा
तुम्ही असे ठरवले आहे की तुमच्याकडे 'ईएलएसएस'मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत. या पैशांची गरज पुढच्या तीन वर्षांत पडेल, असे तुम्हाला वाटते का? तुमचे उत्तर होकारार्थी असल्यास 'ईएलएसएस'मध्ये रक्कम अडकवण्यापेक्षा प्राप्तीकर भरुन उर्वरित रक्कम वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे.