Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अटीमध्ये महत्वाचा बदल, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठ्यासाठी अनुदान दिले जाते. त्यातील एका महत्वाच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी दिलेली भेट होती. ग्रामीण भागात झपाट्याने विकास होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. 

या योजनेंतर्गत ग्रामीण भागात गाई किंवा म्हशींसाठी कायमस्वरूपी शेड बांधण्यात येणार आहे. शरद पवार यांनी ग्रामीण समृद्धी योजना 2023 योजनेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 771188 रुपये खर्च केले आहेत. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि गावांच्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार आहे. 

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 अर्ज प्रक्रिया

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 साठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. सरकारने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 मधील अर्जासाठी कोणतीही माहिती अजून दिलेली नाही. इच्छुक अर्जदाराला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. 

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांना शुभ संधी उपलब्ध करून देताना ही योजना मंजूर करण्यात आली आहे. ज्याचा फायदा घेऊन शेतकरी बांधव सहजपणे आपले उत्पन्न वाढवू शकतो. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक कामात रोजगाराच्या संधी मिळाव्यात, ज्यामुळे तेथील लोकांना व युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल व गावातील स्थलांतर थांबवता येईल.

गाय गोठा अनुदान योजना 

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेत गाईगुरांना गोठा बांधून देण्यासाठी अनुदान देतात. 17 मार्च 2023 ला मिळालेल्या माहितीनुसार, गाई गुरांचे शेण आणि मूत्र यामुळे सेंद्रिय खत तयार होते. पण जनावर जर बाहेर असतील तर त्यांचे शेणखत वाया जाते म्हणून जनावारांसाठी गोठा तयार करण्याचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. त्यासाठी अनुदान पुढीलप्रमाणे दिले जाते. 

अकुशल खर्च

6188 

 8 टक्के 

कुशल खर्च

  71000

 92 टक्के 

एकूण खर्च 

77188

100 टक्के 

योजनेच्या अटीमध्ये बदल करण्यात आला.. 

गाय गोठा योजनेमध्ये जनावरांची ट्रॅकिंग करणे आवश्यक होते. पण, एखाद्या संस्थेकडून मिळालेली जनावरे किंवा कर्ज काढून घेतलेली जनावरे यांनाच ट्रॅकिंग  करता येत होते. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेतून वंचित राहत होते. म्हणून या योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जनावरे ट्रॅकिंग  न करता गावातील तलाठी यांच्या कडून तुमच्याकडे असलेल्या जनावरांची संख्या लिहून असलेला दाखला घेण्यात यावा. ग्राम सेवक यांनी सुद्धा पंचनामा करून आकडेवारी नोंदवली तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पंचनामा करतांना गावातील सरकारी शाळेचे शिक्षक किंवा मग इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे. अशी नवीन अट या योजनेत नोंदवण्यात आली आहे.