आजारी पडल्यावर डॉक्टर आणि औषधोपचारांवरवर बराचं खर्च होतो. कोरोनानंतर Health Insurance Policy घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अजून हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही. तुमचा प्लॅन निवडताना त्यात OPD Cover असेल तर त्यातून अधिकचा फायदा मिळतो.
OPD Cover म्हणजे काय?
OPD म्हणजे Out patient department. एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर 'डॉक्टर ओपीडीमध्ये अमुक अमुक वाजता येतील किंवा आज ओपीडी बंद आहे, असे तेथील रिसेप्शनिस्टकडून तुम्ही कधी ना कधी ऐकले असेल. थोडक्यात, हॉस्पिटलाइज न होता डॉक्टर उपचार करतात किंवा जिथे उपचार करतात त्याला ओपीडी म्हणतात. आणि याठिकाणी होणारा खर्च ज्या प्लॅनमध्ये होतो त्या पॉलिसीला OPD Cover Policy म्हणतात. सामान्यत: Health insurance policy मध्ये ओपीडी कव्हर वेळा नसते. किंवा खूप कमी असते.
पॉलिसी घेण्याचा फायदा काय? (Benefit Of OPD Cover Health Insurance Policy )
जवळपास प्रत्येकाला काही ना आरोग्य विषयक समस्या भेडसावत असतात. यासाठी health insuarance policy घेतली जाते. यामुळे आजारपणात झालेल्या खर्चाचा खिशावर बोजा पडू नये, असा आपला विचार असतो. मात्र याप्रकारे पैसे मिळण्यासाठी किमान 24 तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणं आवश्यक असतं. तर पॉलिसीमधून हा खर्च कव्हर होऊ शकतो.
मात्र, अचानक हवामान बदलाने तुम्ही आजारी पडलात किंवा ताप आल्यावर डॉक्टरांकडे गेलात अशा प्रत्येक वेळी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज नसते. डॉक्टर इंजेक्शन किंवा गोळ्या देऊन सोडून देतात किंवा काही ऑपरेशन्ससुद्धा अशी असतात जी कमी वेळात पूर्ण होतात. उदा. लेझर ऑपरेशन्स 2 - 3 तासात होतात. आणि डॉक्टर पेशंटला संध्याकाळवर घरी देखील सोडतात. अशा वेळी हा झालेला खर्च कव्हर होण्यासाठी OPD Cover health Insuarance policy असणे उपयुक्त ठरते.
यासाठी बहुतेक वेळा पॉलिसी घेताना त्यात काय काय कव्हर होते हे बघणे आवश्यक आहे. हेल्थ पॉलिसी घेताना त्यात OPD Cover होते का, ते बघणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला असे साधारण किती वेळा अधून मधून डॉक्टरकडे जावे लागते, त्याचाही अंदाज घ्यावा. लहान मुलं असल्यास बरेचदा डॉक्टरांकडे जावे लागते. अशा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून, पॉलिसि बारकाईने समजून घेऊन health insurance policy घेणे योग्य ठरते.